उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी!!
आपण सर्वांनीच मागील चार महिन्यांपासून राज्यातील राजकारणात अभूतपूर्व घडामोड पाहायला आहेत. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड करून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह बाहेर पडले. त्यांना 10 अपक्ष आमदारांनी साथ दिली आणि राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतारांचा मोठा फटका उद्धव ठाकरे गटाला बसला.. यानंतर मागील दोन-तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला आता शिंदे गटाच्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे..
काय म्हणाले खा. प्रतापराव जाधव?
बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते कि हिंमत असेल तर बुलढाण्यातील गद्दारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
त्यांच्या या वक्तव्याला आता खासदार प्रतापरावं जाधवांनी खुलं आव्हान दिलं असून हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्या विरोधात बुलढाण्यातूव लोकसभा निवडणूक लढवावी असे जाधव म्हणाले आहेत. एवढेच नव्हे तर मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजकडून लढण्याचा कोणताही विषय येतो नाही. आम्ही मूळ शिवसेनेतच आहोत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. या बंडातील 12 खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचादेखील समावेश आहे.