‘त्या’ व्यावसायिकांना माफक दरात कर्जपुरवठा; अशी आहे सरकारची योजना!
महाराष्ट्र सरकारच्यावतीने पात्र बाधित व्यावसायिकांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आता माफक दरात कर्जपुरवठा करण्याची योजना लागू करण्यात आली आहे.
बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार आहे. त्यांना केवळ 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup