Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शेतीतून कमवा लाखो रुपये; पण कसे? सविस्तर जाणून घ्या!

0

कोरोना काळात लोकांना आरोग्याचे महत्व पटले आहे. त्यामुळेच ‘मायक्रोग्रीन’ या सुपर फूडची मागणी वाढत चालली आहे.

विचार केला तर फळे आणि भाज्यांच्या तुलनेत मायक्रोग्रीनमध्ये ४० पट अधिक पोषक तत्त्वे असतात. म्हणून त्याला सुपरफूड संबोधले जाते. याची मार्केटमधील मागणी पाहता अनेकांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. कारण त्याद्वारे दरमहा लाखो रुपये कमावणे शक्य आहे. चला तर हा व्यवसाय नक्की कसा आहे? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

मायक्रोग्रीन म्हणजे काय? : कोणत्याही झाडाच्या सुरुवातीला येणाऱ्या कोवळ्या पानांना ‘मायक्रोग्रीन’ असे म्हणतात. ही पाने 2 ते 3 इंच लांबीची असतात. ही पानं कोवळी असतानाच तोडून बाजूला केली जातात. या पानांपासून एवढं पोषण मिळतं, की दररोज केवळ ५० ग्रॅम मायक्रोग्रीन्स सेवन केले, तरी पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होतील. यासाठी मुळा, मोहरी, मूग सारख्या झाडांच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो.

मायक्रोग्रीन शेती करायची कशी? : या शेतीची खासियत म्हणजे यासाठी शेतजमीन असलीच पाहिजे, असे काही नाही. घराच्या टेरेसवर, बाल्कनीत किंवा चक्क बेडरूममध्येही तुम्ही ही शेती करू शकता. यासाठी तुम्हाला ट्रे, बियाणं, जैविक खत आणि माती किंवा कोकोपीटची गरज लागते.

मायक्रोग्रीन शेतीसाठी झाडांना प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणं गरजेचं असतं . दररोज काही प्रमाणात पाणी शिंपडलं कि, काही दिवसांमध्येच रोपं उगवण्यास सुरुवात होते. यासाठी तुम्ही मुळा, गाजर अशी कंदमुळं किंवा इतर भाज्यांचाही वापर करू शकता.

या शेतीसाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही; मात्र यातून चांगल्या पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ते योग्य प्रकारे विकता येणे गरजेचे आहे. दोन-तीन आठवड्यांमध्येच हे पीक काढणीसाठी तयार होतं. यानंतर तुम्हाला 5 स्टार हॉटेल, कॅफे आणि सुपर मार्केट्समध्ये तुम्ही हे विकू शकता.

अगदी पॅकिंगमध्ये न विकता, केवळ हॉटेल आणि कॅफेंनाही याचा पुरवठा करू शकता. जर शक्य असेल, तर स्वतःचं दुकान आणि ब्रँड सुरू करूनही याचा व्यवसाय करू शकता. हा अगदी कमी जागेत, कमी भांडवलावर सुरु होणार व्यवसाय असून चांगले उत्पन्न मिळवून देतो.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues