Take a fresh look at your lifestyle.

Hall Ticket : 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, आज जारी होणार तुमचं हॉल तिकीट; या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध..

0

महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आजपासून (ता. 27 जाने.) हॉल तिकिट (प्रवेशपत्र) उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

बारावी बोर्डाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आजपासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. महाविद्यालय अन् शाळांना ते डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी लागणार आहे आणि मग ही प्रत विद्यार्थ्यांना वाटप करायची आहे, असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

प्रवेशपत्रं हरवल्यास…

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, अशाही सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues