Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra New Governor : महाराष्ट्रात राज्यपाल पदासाठी आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा..!

0

महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच म्हणजे 5 सप्टेंबर 2019 रोजी भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो किंवा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या, राज्यपालांची याबाबतची कृती वादग्रस्त ठरली होती. याशिवाय महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं करुन त्यांनी अनेकदा विनाकारण वाद ओढवून घेतला आहे.

एवढेच नव्हे तर राज्यात 2019 साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून ते 2022 मध्ये सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारची प्रतिष्ठापना होईपर्यंत कायमच राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Current Governor Bhagat Singh Koshyari) चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. परंतु मागील दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यात असताना कोशारी यांनी त्यांच्याकडे राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीनंतर ते राज्यपालपदावरुन कधी पदमुक्त होणार? त्यांची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला होता.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याबाबत सध्या या दोन नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणती आहेत हे 2 नवे जाणून घेऊया सविस्तर..

राज्यपाल पदासाठी कोणत्या नावांची सध्या चर्चा :

  • महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत आहे.
  • तर दुसरीकडे पंजाबमध्ये भाजपाची पकड आणखी मजबूत करण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपा येत्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संधी देऊ शकते.

दरम्यान, भाजप नेते या विषयी कोणतेही भाष्य करण्यास तयार नसून येत्या काळात भगतसिंह कोश्यारी पदमुक्त झाल्यास महाराष्टाचे पुढील राज्यपाल कोण होणार हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues