Take a fresh look at your lifestyle.

असा करा राष्ट्रीय बायोगॅस योजना २०२१ साठी अर्ज!

0

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. या बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसणे, वीजनिर्मिती, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जात असतो. आज आपण राष्ट्रीय बायोगॅस योजना २०२१ नक्की काय आहे? यासाठी किती अनुदान मिळते? आवश्यक कागदपत्रे काय? याबाबत माहिती जाणून घेऊयात…

राष्ट्रीय बायोगॅस योजना काय आहे? :

● ही केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना ahe .
● ती केंद्र शासनाच्या नवीन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जात असते.
● ही 100 % केंद्र पुरस्कृत योजना आहे.
● उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असते.

उद्देश काय? :
● ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे.
● ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधरविणे.
● सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखणे.
● शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप.

नक्की किती अनुदान मिळते? :

● सर्वसाधारण गट : 9,000/- रुपये प्रति संयत्र
● अनुसूचित जाती व जमाती : 11,000/- रुपये प्रति संयत्र
● शौचालय जोडणी असल्यास : 1,200/- रुपये प्रति संयत्र

‘या’ ठिकाणी संपर्क करा :
● जिल्हा स्तर : कृषी विकास अधिकारी
● तालुका स्तर : गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी (कृषी)

आवश्यक कागदपत्रे :

● पंचायत समिती मंजुरी आदेश.
● अनुदानाबद्दल करावयाच्या मागणीचा अर्ज.
● बायोगॅस संयंत्र पूर्णत्वाचा दाखला.
● बायोगॅस बांधकाम करणाऱ्या गवंड्याचे हमीपत्र, बांधकाम सुरू असलेले फोटो गवंड्यासह.
● प्रतिज्ञापत्र समजुतीचा नकाशा.
● राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 2021 असे ॲपलिकंट लिहिलेला लाभार्थी गवंडी यांचा फरशीसह फोटो.
● घराचा उतारा, आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स.

संदर्भ : ग्राम विकास पपंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues