Take a fresh look at your lifestyle.

WorldWide Currencies : जगभरातील चलनं आणि त्यांचा अर्थ आणि इतिहास; वाचा रुपया चलन किती जुनं?

0

रूपयापासून ते पौंडपर्यंत जगभरातील विविध चलनं आहेत. विविध देशातील चलनांना विशिष्ट नावे का आहेत? कधी आपण याचा विचार केलाय का? नसेल ना. मात्र जगभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ ऑक्सफर्ड शब्दकोशाने शोधून काढण्याचा प्रयत्न केला त्यातून जी माहिती मिळाली ती जाणून घेऊयात…

रुपया : भारत, पाकिस्तान तसेच इंडोनेशिया देशांचे चलन रुपया या नावानेच ओळखले जाते. संस्कृत शब्द ‘रुप्या’ ज्याचा अर्थ चांदी असा होतो यावरुन रुपया हा शब्द आला आहे.

डॉलर : आज जगभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, न्यूझिलंड, कॅनडा आणि सिंगापूर या प्रमुख देशांच्या चलनाचे नाव डॉलर आहे. जर्मनी भाषेतील ‘जोआकिमस्थालर’ या शब्दातून ‘डॉलर’ हा शब्द आला. ‘जोआकिमची खाण’ असा त्या शब्दाचा अर्थ आहे. या ठिकाणी चांदीच्या खाणी होत्या. जोआकिमच्या खाणीतून मिळवलेल्या खाणीतील चांदीतून नाणी तयार केली जात असत. पुढे त्यांना ‘थालर’ म्हटले जाऊ लागले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन ‘डॉलर’ हा शब्द आला.

पेसो : स्पॅनिश भाषेत पेसो या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे ‘वजन’ असा आहे.

लिरा : इटालियन आणि टर्की यांचे मूळ चलन असलेले ‘लिरा’ हे नाव ‘लिब्रा’ या लॅटिन भाषेतील शब्दावरून आले आहे. या शब्दाचा अर्थ आहे ‘एक पौंड’ (वजन) आहे.

मार्क : युरो हे चलन उपयोगात आणण्याआधी जर्मनीचे चलन असणारे मार्क आणि फिनलंडचे चलन असणारे मक्र्का यांचा अर्थ ‘वजन मोजण्याचे एक एकक’ याच्याशी संबंधित होता.

रियाल : ओमान, इराण, कतार, सौदी अरेबिया आणि या येमन या देशांमध्ये रियाल हे चलन वापरले जाते. लॅटिन शब्द ‘रिगलीस’ ज्याचा अर्थ ‘रॉयल’ (राजेशाही) असा आहे या शब्दातून ‘रियाल’ हा शब्दा आला आहे.

रँड : दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटर्सरँड या सोन्याच्या खाणी असलेल्या ठिकाणांवरुन ‘रँड’ हे चलन आले आहे.

दिनार : जॉर्डन, अल्जेरिया, सर्बिया आणि कुवेत या देशांचे चलन दिनार आहे. प्राचीन काळी रोमन साम्राज्यात वापरल्या जाणार्या ‘दिनारिअस’ या नाण्याच्या नावावरून हा शब्द आला आहे.

पौंड : इजिप्त, लेबनन, दक्षिण सुदान, सुदान आणि सीरिया ही राष्ट्रे आपापल्या चलनांना पौंड म्हणतात. ब्रिटनचे चलन असलेले पौंड हा शब्द लॅटिन भाषेतील ‘पौंडस’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ ‘वजन’ असा होतो.

रुबल : रशिया आणि बेलारुस यांचे रुबल हे चलन आहे. या चलनाचे नाव चांदी मोजण्याचे एकक असणाऱ्या ‘रुबल’ वरून आले आहे.

Government’s Decision : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांत सर्वसामान्य जनतेला मिळणार ‘या’ वस्तू

शेतकरी बांधवांनो समजून घ्या मुरघासासाठी २ एकर मका लागवडीचे गणित!

कर्ज आणि सरकारी योजनांच्या बातम्या व्हॉट्सअॅपवर मिळतील, सरकार आणणार ChatGPT सारखी प्रणाली

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues