Wheat and flour Price Hike : अरे देवा!! आता ताटातली चपाती होणार महाग; गव्हाच्या व पिठाच्या किंमतीत मोठी वाढ
अनेक घरांमध्ये सकाळी नाश्त्या ऐवजी चपाती भाजी केली जाते, चपातीशिवाय अनेक घरांमध्ये जेवण पूर्ण होत नाही. परंतु पोटाची भूक भागवणारी तीच चपाती आता महागणार आहे. नेमके प्रकरण काय? गव्हाच्या व पिठाच्या किंमतीत किती वाढ होणार जाणून घेऊया सविस्तर… (Wheat and flour)
मिळालेल्या माहितीनुसार.. सध्याच्या घडीला पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागांत गव्हाच्या किंमतीत देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.
दरम्यान. देशात मागील काही दिवसांपासून गव्हाचे दरात वाढ होत असून यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडलं आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे.