Take a fresh look at your lifestyle.

Weather Update : आता तरी बास कि देवा!! होळीपूर्वी राज्यात पुन्हा पाऊस बरसणार

0

Weather Update : महाराष्ट्र्रामध्ये मागील फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे. कारण होळीच्या आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काय म्हणाले हवामान विभाग :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार.. येत्या 4 ते 6 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे तर उर्वरित मार्च ते मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

एवढेच नव्हे तर मागील काही वर्षात तापमाना होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरते. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता :

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues