Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर सरकारला जाग; टोमॅटोबाबत घेतला मोठा निर्णय

0

देशात टोमॅटोचे भाव गडगडल्याने हैराण शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. MIS (Market Intervention Scheme) योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.

दरम्यान या व्यवहारात राज्य सरकारला सहन करावा लागणाऱ्या तोट्यातील 50 टक्के वाटा केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येईल, अशी माहिती भारती पवार यांनी दिली आहे.

राज्य सरकारने केंद्राला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याची विनंती देखील पवार केली. त्याचप्रमाणे टोमॅटोची निर्यात सुरूच असून ती बंद केलेली नसल्याचे स्पष्टीकऱण देखील त्यांनी दिले.

यंदा महाराष्ट्रात टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून पुरवठा वाढल्यामुळे मागणी घटल्याने भाव उतरले आहेत. 2 ते 3 रुपये किलो दराने टोमॅटो विकावे लागत असल्याने उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी माल रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसले. त्यानंतर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews