Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ दोन व्यवसाय सुरू करा; सरकार देईल 80% पर्यंत कर्ज

0

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? भांडवल कमी आहे? त्यामुळे चिंतीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. ज्या वापरून तुम्ही सहजपणे व्यवसाय सुरु करू शकता. आपण 2 ते 3 लाख रुपयांच्या गुंतवणूकीने व्यवसाय करण्याचा विचार करताय तर केंद्र सरकार तुम्हाला मुद्रा योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यात मदत करू शकते. मुद्रा योजनेच्या माध्यमातून सरकार छोट्या उद्योगांना 75 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. या फायदेशीर व्यवसायाबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया…

  1. लाकडी फर्निचर : जर आपण लाकडी फर्निचरचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी केंद्र सरकारची कर्ज योजना आपल्या फायद्याची ठरेल. याच्या मदतीने आपण आपला व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता.

किती गुंतवणूक लागेल? : व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 1.85 लाख रुपये गुंतवावे लागतील.

किती टक्के सरकारी कर्ज मिळेल? : या योजनेंतर्गत तुम्ही बँकेकडून एकत्रित कर्जाखाली 7.48 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

किती फायदा होईल? : व्यवसायाचा सर्व खर्च काढून आपण 60 हजार ते 1 लाख रुपयांची बचत करू शकता.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

2. संगणक असेंबलिंग : जर आपण संगणकाशी संबंधित व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आपण संगणक एकत्र करणे हा व्यवसाय सुरु करू शकता.

किती गुंतवणूक आवश्यक? : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला सुमारे 2.70 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

किती टक्के कर्ज मिळेल? : यासाठी तुम्हाला बँकेकडून सुमारे 6.29 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

फायदा किती होईल? : जर तुम्ही वार्षिक 630 युनिट बनवली तर त्यांची विक्री केल्यास तुम्ही जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचा नफा सहज मिळवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues