Take a fresh look at your lifestyle.

जांभळांच्या बियांचे आरोग्यदायी फायदे

0

मधुमेहावरील नैसर्गिक उपाय म्हणजे जांभूळ. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत बरं. जांभळाच्या बियांचा उपयोग मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास देखील होतो. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ जांभळांच्या बियांचे आरोग्यदायी फायदे…

● या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करा. हा लेप चेहेऱ्याला लावला तर चेहेऱ्यावरच्या मुरुम, पुटकुळ्या निघून जातील.
● या बिया धुवून उन्हात वाळवा. यानंतर बियांचे बारीक तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर सकाळी उपाशीपोटी पाण्यात टाकून घेतल्यास फायदा होईल.
● जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदा होईल.
● जांभळांच्या बियांच्या पावडरने दंतमंजन केल्यास त्याने तोंडाला बॅक्टेरिया मुक्त ठेवता येईल तसेच स्वस्थ हिरड्यांसाठी देखील फायदा होईल.
● पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असते.
● या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते.
● डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात हे फायदेशीर ठरते.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.