Take a fresh look at your lifestyle.

Social Media Trending : बॉस असावा तर असा! चक्क आपल्या कर्मचाऱ्याला दिली 57 लाख रुपयांची कार भेट

0

Social Media Trending : रस्त्यावरून जाणारी एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात. अशी गाडी घेणं अनेकांचं स्वप्न असतं. काही लाखांची किंमत असणारी अशीच एखादी गाडी एखाद्या कर्मचाऱ्याला तो काम करत असलेल्या कंपनीच्या मालकानं भेट दिली तर? असाच काहीसा प्रकार केरळमधील क्लिंट अँटोनी या कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला आहे.

नेमके प्रकरण काय?

मार्च महिना जवळ येताच अनेक कर्मचाऱ्यांना अपरायझलचे वेध लागतात. या काळात जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये कर्मचारी मनापासून कामात व्यस्त असतात. एखाद्या कर्मचाऱ्यानं वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ एप्रिल-मेमध्ये नक्की मिळतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील क्लिंट अँटोनी हा कर्मचारी.

अँटोनी यांना ते काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकानं तब्बल 57 लाख रुपये किमतीची लक्झरी सेडान मर्सिडीज बेंझ सी-क्लास ही कार भेट दिली आहे. ते गेल्या 11 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळे त्यांना ही कार भेट म्हणून देण्यात आलीय.

क्लिंट अँटोनी हे वेबँडक्राफ्ट या आयटी कंपनीमध्ये काम करतात. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे ते पहिले कर्मचारी आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते कंपनीचे सर्वात निष्ठावान आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी आहेत. कंपनीच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues