Take a fresh look at your lifestyle.

Indian citizenship : धक्कादायक..!! रोज तब्बल ‘इतके’ जण सोडतात भारतीय नागरिकत्व; चिंताजनक आकडेवारी आली समोर

0

विदेशात जाण्याची आणि शिकण्याची अनेक भारतीयांची मोठी इच्छा असते अशा अनेक गोष्टी नेहमी कारणांवर देखील येतात. एवढेच नव्हेच मागील काही वर्षांपासून तर नोकरी आणि व्यवसायासाठीही अनेक भारतीय विदेशात जात आहेत. त्यामुळे आता भारतीयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षमध्ये सर्वाधिक नागरिकांनी भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) सोडल्याचं चिंताजनक आकडेवारी समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील 11 वर्षांत 16 लाखांहून अधिक जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले असून हे प्रमाण दररोज सरासरी 400 इतके आहे. तर 2021 व 2022 मध्ये हा वेग वाढला आहे व आता हे प्रमाण दिवसाला सरासरी 500 इतके आहे.

देश सोडण्याचे कारण काय? What are the reasons for leaving the country?

  • मुलांच्या भविष्यासाठी
  • परिवारासाठी चांगल्या आरोग्य सुविधा
  • कमाईच्या अधिक संधी आणि कमी कर
  • महिला व मुलांसाठी सुरक्षित वातावरण हवे
  • आधुनिक जीवनशैली आणि प्रदूषणमुक्त हवा
  • देशात वाढणारे अपराध व व्यवसायासाठी कमी संधी

किती जणांनी देश सोडला?

  • 2011 : 1,22,819
  • 2012 : 1,20,923
  • 2013 : 1,31,405
  • 2014 : 1,29,328
  • 2015 : 1,31,489
  • 2016 : 1,41,609
  • 2017 : 1,33,049
  • 2018 : 1,34,561
  • 2019 : 1,44,017
  • 2020 : 85,256
  • 2021 : 1,63,370
  • 2022* : 1,84,741
  • (*31 ऑक्टोबरपर्यंत)

(स्रोत : सरकारने लोकसभेत दिलेली माहिती)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues