Take a fresh look at your lifestyle.

Chhatrapti shivaji Maharaj शिवरायांचे बळीराजांसाठी असलेली शिव-धोरणे एकदा पहाचं!

0

Chhatrapti shivaji Maharaj शिवकाळात शेतकऱ्यांसाठी अशा काही योजना छत्रपतींनी सुरू केल्या होत्या ज्या आजही आदर्शवत ठरणाऱ्या आहेत. या मॉडर्न म्हणणाऱ्या समाजापुढे आधुनिकीकरणाच्या या युगात माझ्या राजाने तयार केलेले शेतकऱ्यांसाठीचे धोरण आजही पुरून उरणारी आहेत. त्यावेळी शिवछत्रपतींनी बळीराजासाठी जी शेती उपयोगी धोरणे आखली होती त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. असं म्हणण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या शेतकरी राजाने त्यावेळी केला नाही. त्यावेळी आता ज्या पद्धतीने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्राचा वापर आहे तितका वापर देखील नव्हता.

शिव धोरण : ज्या रयतकडे शेती कसण्याची कुवत आहे, मनुष्यबळ देखील आहे मात्र जमिनीची मशागत करण्यासाठी बैलजोडी नाही अशा रयतेला, शेतकऱ्यांना बैल जोडी घेण्यासाठी रोख रक्कम किंवा बैल जोडी बी-बियाणे शासनाकडून उपलब्ध करून दिली जात होती.

शिव धोरण : शिवकाळात शेतकऱ्यांना कर्जाची देखील सुविधा होती. आताही कर्ज मिळतं मात्र त्यासाठी सिबिल लागतो. शिवाय शिवकाळात कर्जाची वसुली करताना टप्प्याटप्प्याने वसुली केली जात असे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले तर कर्जाची वसुली होत असे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खातरजमा स्वतः शिवप्रभुराजे करत असत.

शिव धोरण : शिवकाळात आत्तासारखी प्रगत तंत्रज्ञान नव्हती, यंत्रमाग नव्हते तरीदेखील गावोगावी फिरून स्वराज्यात जेवढे शेतकरी आहेत त्यांची माहिती जसे की शेतकऱ्यांकडे बैल जोडी आहे का, किंवा शेती कसण्यासाठी शेतकऱ्यांकडे कशी सुविधा आहे यासारख्या बाबींची विचारपूस केली जात असे.

शिव धोरण : स्वराज्यातील पडीक जमिनी पडीक न राहता बागायती केल्या गेल्या पाहिजेत. यासाठी शिवप्रभुंकडून शासन दरबारातून रोख रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे धोरण त्यावेळी शिवप्रभूंनी आखलं होतं.

शिव धोरण : ज्या शेतकऱ्यांकडे मागच्या कर्जाची थकबाकी आहे, मात्र सद्यास्थितीला कर्ज देण्याची त्याची परिस्थिती नाही परंतु शेती कसण्याची उमेद आहे अशा शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करावी असा आदेश माझ्या राजाने त्यावेळी काढला होता. राजांचा आपल्या जनतेवर, शेतकरी राजावर असणारा हा विश्वास त्यावेळी यशस्वीरित्या राजकारभार चालवण्यास मदत करत होता. विशेष म्हणजे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्यासारखं असेल तर सरकार दरबारी कळवावे असे धोरण देखील त्यावेळी होत.

शिव धोरण : त्या काळात रासायनिक खत वापरले जात नव्हती, रासायनिक खतांचा शोधही नव्हता. संपूर्णपणे सेंद्रिय शेती त्यावेळी होत होती. मात्र आत्ताची पिक पाहणी आणि माती परीक्षण त्यावेळी पण होतं. जमिनीची प्रत पाहून त्या जमिनीवर कोणते पीक घ्यावं यासाठी पत्रकही तयार झालं होतं. म्हणजेच आत्ताच सॉइल हेल्थ कार्ड त्यावेळी माझ्या राजाने आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं होतं. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवप्रभूनी सोईल हेल्थ कार्ड म्हणजेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावं यासाठी जे काही परिपत्रक त्यावेळी सुरू केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच उत्पादन मिळत होतं. याला शिवकाळात पीक पाहणी म्हणून संबोधत असावेत. पुढे हीच पद्धत ब्रिटिशांनी कॉपी-पेस्ट केली.

शिव धोरण : आत्ता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. तेव्हाही असाच सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. आता मात्र, निसर्गाच्या लहरीपणापेक्षा शासनाचे उदासीन धोरण शेतकऱ्यांसाठी कष्टदायक सिद्ध होत आहे. तेव्हा मात्र शिवप्रभूंचं धोरण शेतकऱ्यांसाठी या संकट काळात देखील उभारी घेण्यासाठी फायद्याचं ठरत होतं. असं सांगतात की अतिवृष्टी दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत असे म्हणून शासन दरबारी महसूल जमा झाला नाही तरी चालेल मात्र शेतकऱ्यांकडून सारा वसूल करायचा नाही असं धोरण त्यावेळी शिवप्रभूंनी आखलं होतं.

शिव धोरण : शिवकाळात असलेल्या सावकारांना व्यापाऱ्यांना कष्टकरी रयतेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही त्यांची पिळवणूक होणार नाही यासाठी छत्रपतींकडून समज देण्यात आला होता.

शिव धोरण : शिवकाळात शेतजमीन मोजणीसाठी देखील शिवरायांनी प्रयत्न केल्याचे काही ऐतिहासिक दस्तऐवजामधून समोर आले आहे. आता अनेक लोक म्हणतील जमीन मोजणी केलं तर यात काय विशेष. मात्र शिवकाळात आत्तासारखी प्रगत तंत्रज्ञाने नव्हतीच. जमीन मोजणी करण्यासाठीही विशिष्ट अस तंत्रज्ञान नव्हतं. अशा परिस्थितीत संपूर्ण स्वराज्याची शेतजमीन मोजणी करणे म्हणजे मोठं आव्हानात्मक काम होतं. आता संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध असून पूर्वीच्या तुलनेत अधिक मनुष्यबळ असून शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणी करताना नाकी नऊ येतात. अनेक ठिकाणी पायपीट करावी लागते. मात्र त्यावेळी शिवप्रभूंनी संपूर्ण स्वराज्याच्या शेतजमिनीची मोजणी केल्याचे सांगितले जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, त्यावेळी काठीच्या सहाय्याने शेत जमिनीची मोजणी होत. पाच हात पाच मूठ लांब एक काठी घेतली जात असे. अशा 20 काठ्याच्या तुकड्याला बिघा असं संबोधलं जात. या अशा 120 बिघ्याचं एक चावर बनत. अशा पद्धतीने त्यावेळी मोजणी होत असल्याचं काही ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये नमूद आहे.

असं सांगतात की त्यावेळी, महालेखरी दप्तरी पीक लागवडीची मशागतीची नोंद ठेवली जात असे. एकंदरीत, आतासारखं प्रगत तंत्रज्ञान त्यावेळी नसतानाही शिवप्रभूनी स्वराज्यात एकही शेतकरी आत्महत्या होऊ दिली नाही. शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊ दिलं नाही. आता मात्र शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतांनाही शेतकरी आत्महत्येचा आकडा शिखरावर जात आहे. शेतकरी उन्नती करण्याऐवजी अधोगतीला जात आहे. यामुळे राजे पुन्हा जन्माला या, पुन्हा शिवकाळातील शिवधोरण या देशाला द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

India Milk Production : दुग्धोत्पादनात भारतच नंबर 1; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांची माहिती

5 Major Earthqaukes In India : भारतातील 5 सर्वात भयंकर भूकंप

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues