Take a fresh look at your lifestyle.

Turkey Earthquake Update : तुर्कस्तान, सिरियातील भूकंप बळींची संख्या 24 हजारांवर; तर जखमींची संख्या 40 हजारांहून अधिक

0

7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मृतांची संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे. कडाक्याच्या थंडीत बचावकार्य सुरु आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की किमान 10 लाख लोकांकडे खायलाही पैसे नाहीत. एकट्या सीरियात बेघरांची संख्या 5.3 दशलक्ष इतकी झाली आहे.

आग्नेय तुर्कीतील गाझियानटेप प्रांतातील नूरदागी जिल्ह्यात झाहिदे काया नावाच्या गर्भवती महिलेला 115 तासांनंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांची सहा वर्षांची मुलगी कुब्रा हिला देखील ढिगाऱ्यातून वाचवण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती सुरक्षित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी 35 लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे. काही शहरांच्या रस्त्यांवर पांघरूण, गालिचे व कापडांत गुंडाळलेले मृतदेह पडले आहेत. शवागार व स्मशानभूमीवरही ताण वाढला आहे. या भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे.

तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे, आपत्तीग्रस्त भागात आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू असताना, मृतदेह आणि जखमी लोक सापडत आहेत. मृतांचा आकडा 24 हजारांवर गेला. तर जखमींची संख्या 40 हजारांहून अधिक आहे.

5 Major Earthqaukes In India : भारतातील 5 सर्वात भयंकर भूकंप

Turkiye Earthquake : या माणसाने तीन दिवस आधीच केली होती तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाची भविष्यवाणी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues