Take a fresh look at your lifestyle.

safety helmet : वेगवेगळ्या रंगाचे सेफ्टी हेल्मेट नेमकं काय दर्शवतात?

0

Safety Helmet : आपल्या पैकी कदाचित अनेक लोकांना माहिती आहे कि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या पदावरून आणि पेशावरून ओळखण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे सेफ्टी हेल्मेट ठरवून दिलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी अगदी कामगारांपासून ते मॅनेजर आणि इंजिनीअरपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरील लोकं काम करत असतात. अशावेळी त्यांना ओळखणं कठीण असतं. त्यामुळेच बांधकाम क्षेत्रात करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या पदावरून आणि पेशावरून ओळखण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे सेफ्टी हेल्मेट ठरवून दिलेले असतात

कोणत्या कामगाराला कोणत्या रंगाचे हेल्मेट दिले जाते जाणून घ्या थोडक्यात…

पांढऱ्या रंगाचे हेल्मेट : पांढऱ्या रंगाचे हेल्मेट हे मॅनेजर, पर्यवेक्षक, कामगारांचा प्रमुख आणि अभियंता यांना दिले जाते.

हिरव्या रंगाचे हेल्मट : या रंगाचे हेल्मेट हे सुरक्षा निरीक्षक आणि नवीन कामगारांना दिले जाते.

केशरी रंगाचे हेल्मेट : रस्ते बांधकाम करणारे कामगार हे केशरी रंगाचे हेल्मेट घालतात.

तपकिरी रंगाचे हेल्मेट : हे वेल्डिंगची कामं करणाऱ्या कामगारांना नेमून दिलेली आहेत.

निळ्या रंगाचे सेफ्टी हेल्मेट : सुतार, इलेक्ट्रिशियन आणि इतर तांत्रिक बाबी हाताळणाऱ्यांना हे हेलमेट दिले जाते.

पिवळ्या रंगाचे हेल्मेट : सामान्य मजूर आणि खोदकाम निगडित ऑपरेटर्ससाठी पिवळ्या रंगाचे हेल्मेट असते.

राखाडी रंगाचे हेल्मेट : ज्यांना बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन तिथली माहिती जाणून घ्यायची आहे अशांना राखाडी रंगाचे हेल्मेट दिले जातात

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues