Take a fresh look at your lifestyle.

Pressmud Benefits For Crops : शेतकऱ्यांनो जाणून घ्या ऊसाच्या Cropsचा (प्रेसमडचा) शेतीमधील वापर आणि त्याचे फायदे

0

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्‍यक असला तरी शेणखत, कंपोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत. यावर पर्यायी उपाय म्हणून ऊस साखर कारखान्यांतून उपलब्ध होणाऱ्या उपपदार्थांपैकी घट्ट मळी म्हणजेच प्रेसमड केकचा वापर शेतीत फायद्याचा ठरू शकतो.

कारखान्यात साखर तयार होताना स्पेंटवॉश (पातळी मळी), बगॅस व प्रेसमड (घट्ट मळी) इ. उपपदार्थ तयार होतात. एक टन उसापासून साधारण 110 ते 120 किलो साखर, 40 किलो स्पेंटवॉश (मळी), 30 ते 40 किलो प्रेसमड केक व 300 किलो बगॅसचे उत्पादन होते.

या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो.

साखर कारखान्यात रस शुद्ध करण्यासाठी गाळल्यानंतर अशुद्ध पदार्थांचा जो चोथा राहतो, त्यास प्रेसमड किंवा फिल्टर केक म्हणतात.

कारखान्यात गाळ केलेल्या उसाच्या तीन टक्के प्रेसमड मिळते. म्हणजेच 100 टन उसाचे गाळप केले तर त्यापासून तीन टन प्रेसमड मिळते.

प्रेसमडचे रासायनिक पृथक्‍करण केले असता त्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 1.7 टक्के नत्र, 2.4 ते 2.6 टक्के स्फुरद, 1.0 ते 1.4 टक्के पालाश आणि 2 ते 2.3 टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात. प्रेसमडमध्ये गंधकाचे प्रमाण 2 ते 2.3 टक्के असल्याने चोपण जमीन सुधारण्यास प्रेसमडचा उपयोग होतो.

प्रेसमड वापरताना घ्यावयाची काळजी :

प्रेसमड जमिनीत वापरण्यापूर्वी किंवा वापरताना दक्षता घ्यावी. कारखान्यात तयार झालेला प्रेसमड लगेच पिकासाठी वापरू नये.
प्रेसमडमध्ये मेणाचे प्रमाण आठ ते नऊ टक्के असल्याने ते जमिनीत कुजण्यास वेळ लागतो म्हणून उसाची लागण करण्यापूर्वी कमीत कमी एक ते दोन महिने अगोदर प्रेसमड जमिनीत पहिल्या नांगरणीनंतर घालावे आणि दुसरी नांगरणी करून जमिनीत मिसळून घ्यावे. प्रत्येक वर्षी एकाच शेतात ताज्या प्रेसमडचा वापर न करता दोन वर्षातून एकदाच करावा.
कंपोस्टेड प्रेसमड दरवर्षी वापरले तरी चालते. भारी खोल जमिनीत दरवर्षी प्रेसमडकेक वापरल्याने जमिनीतील 25 ते 30 सें.मी. खोलीवर घट्ट थर तयार होण्याची शक्‍यता असते, त्यामुळे जमिनीतील जादा पाण्याचा निचरा चांगला होत नाही.

प्रेसमड वापराचे निष्कर्ष :

उसाला प्रेसमड वापराबाबत पाडेगाव येथे झालेल्या संशोधनाचे निष्कर्षावरून असे दिसले, की उसाला प्रति हेक्‍टरी सहा टन प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त रासायनिक खताच्या मात्रेमध्ये 33 टक्के बचत होते. तर प्रति हेक्‍टरी नऊ टन प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये 66 टक्के बचत होते.

साखर कारखान्यातील उपपदार्थांपासून तयार होणारे आणखी एक खत म्हणजे प्रेसमड कंपोस्ट खत. हे खत प्रेसमड व स्पेंटवॉश योग्य प्रमाणात मिसळून तयार केले जाते. अशा प्रकारच्या कंपोस्टचे रासायनिक गुणधर्म, त्याची उसासाठी उपयुक्तता व जमिनीवर होणारे परिणाम इ. बाबतीत पाडेगाव येथील संशोधनात असे दिसले की, पूर्वहंगामी उसासाठी 400-170-170 किलो प्रति हेक्‍टर नत्र – स्फुरद – पालाश व दहा टन शेणखत प्रति हेक्‍टरी वापरण्याऐवजी 325-100-120 किलो प्रति हेक्‍टरी नत्र – स्फुरद – पालाश + 75 टन प्रति हेक्‍टरी प्रेसमड कंपोस्ट वापरले तर नत्र, स्फुरद व पालाशमध्ये अनुक्रमे 75, 70 व 50 किलो हेक्‍टरी बचत होते.

Indoor Plant Tips : कुंडीतील रोपांसाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपयुक्त टिप्स

IFFCO NANO Urea Export : आता NANO युरिया लिक्विड 25 देशांमध्ये होणार निर्यात; इफको वर्षअखेरीपर्यंत इतक्या कोटी बाटल्या तयार करणार

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues