Take a fresh look at your lifestyle.

Plant Growth Regulators : शेतकरी बांधवांनो समजून घ्या; शेतीतील संजीवकाचे महत्व आणि त्याचे प्रकार

0

Auxins ऑक्झिन्स : यांच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते उदा. :
आय.ए.ए., आय.बी. ए. : कलम करताना भिन्न वनस्पतींच्या पेशींचा एकजीव करण्याचा उद्देश असतो. फळपिके, विविध शोभेच्या झुडपांच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्झिनचा वापर यशस्वितेने करता येतो.
पानांवर व फळांवर ऑक्सीनची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची अकाळी गळती टाळता येते.
द्राक्षाची बियाविरहित प्राप्त करण्यासाठी ऑक्सिनचा वापर केला जातो.
वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरता अंजीर,सफरचंद, अननस, पीच, चहा, गुलाब, बोगनवेलिया, रबर इत्यादी झाडांच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी केला जातो.
2, 4-डी 2,4-D आणि एन.ए.ए.NAA च्या वापरामुळे टोमॅटो, वांगी, अंजीर यांची फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते, तर एनएएमुळे सफरचंदाच्या फुलांची विरळणी होऊन उरलेल्या फळांचे आकारमान वाढते व त्याचा रंग व दर्जा सुधारतो.

cytokinins सायटोकायनिन्स :
या संजीवकांच्या अंगी वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आढळते. उदा. कायनेटिन.
पेशींची वृद्धावस्था टाळणे, बीज अंकुरणासाठी बिजांची सुप्तवस्था लवकर संपविणे.
प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे करणे इ. सायटोकायनिन्स उपयोगी ठरते.

Farmer Production Organization : शेतकरी उत्पादक गट काय आहेत? त्यातून शेतकऱ्यांना काय मदत मिळेल?

जिबरेलिन्स : Giberlins :
या संजीवकांत पेशी विभाजनाची व त्यांची लांबी वाढविण्याची अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. उदा.-
जी.ए.1 ते जी.ए. 59 : बीजाची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन्स गटातील संजीवकामध्ये बिया काही काळ भिजविल्यास बियांची उगवण चांगली व लवकर झालेली आढळते.वाढिचा वेग वाढवणे तसेच बियाविरहीत फळ प्राप्त करण्यासाठी जिबरेलिन्सउपयोगी आहे.
काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलापासून फळे मिळतात म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्याअधिक प्रमाणात व लवकर आणण्यासाठी 100 पीपीएम जिब्रेलिक आम्ल वापरतात.

वाढरोधके नियंत्रके : वनस्पतीच्या शरीरांतर्गत चालणाऱ्या क्रिया कमी करण्याची अगर पूर्णपणे थांबविण्याची, नियंत्रित करण्याची क्षमता या गटातील संजीवकांच्या अंगी आढळते.काही पिकांमध्ये फलधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याने त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.बऱ्याच वेळा हवामान, सूर्यप्रकाश यातील बदलांमुळे अथवा नैसर्गिक हंगामात फांदीच्या टोकास वाढ, संजीवकाचे जादा प्रमाण तयार झाल्याने फळझाडांना बहर निघत नाही. त्याकरिता द्राक्ष, अंजीर, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी यांसारख्या फळझाडांवर हवामान व त्यांची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन वाढरोधक गटांतील संजीवकांचा क्रमाने केलेला वापर परिणामी बहर काढण्यात मदतीचा ठरतो.

ॲपसिसीक ॲसिड : हे वाढ रोधक संप्रेरक आहे.
यामुळे पेशींना वृद्धवस्था येते.अति प्रखर उन्हातपानगळ करुन बाष्पोच्छवास थांबवुन पाण्याची बचत करण्यासाठी हे फायदेशिर आहे.

इथिलीन : हे वाढ रोधक संप्रेरक आहे वनस्पतीमधील इतर संप्रेरकांपैकी इथिलीन फक्त इथिलीन नैसर्गिक स्थितीत वायुरुपात असत.
फळांचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी (फळे लवकर पिकवण्यासाठी) हे उपयोगी आहे.

इतर महत्वाचे पिक संवर्धके :
ह्युमिक अँसिड :
हे एक भुसुधारक आहे.भारी जमिनीमध्ये वापरल्यास जमिनीतील सोडीयम किंवामँग्नेशिअम व माती या मधील अणु तुटले जातात व जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात. बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.

अॅस्कॉर्बिक अॅसिड : बियाणांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी तसेच वनस्पतीच्या मुळांच्या वाढीचा वेग वाढविण्यासाठी अॅस्कॉर्बिक अॅसिडचा उपयोग होतो.
तसेच या घटकामुळे वनस्पतीचे अतिनील किरणांपासुन पिकाचे संरक्षण होते.
फळगळ कमी करण्यासाठी हे उपयोगी
पिकांची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशिर आहे.
नायट्रोबेन्झीन : हे फुलांची संख्या वाढविणारे उत्तेजक आहे. याच्या वापरामुळे पिकांच्या कॅनोपित (घेरावात) वाढ होते. मादी व उत्पादित फुलांची संख्या वाढुन नर फुलांची संख्या तुलनेने घटते. व परिणामी उत्पादनात वाढ होते.

Indoor Plant Tips : कुंडीतील रोपांसाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपयुक्त टिप्स

Soil For Crop : जाणून घ्या कोणती माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues