Take a fresh look at your lifestyle.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojna : महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये मिळणार

0

अर्थमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अर्थसंकल्प Maharashtra Budget सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा व्यापक विस्ताराची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर, या योजनेवर १००० कोटी रुपये खर्च करणार.

शेतकऱ्याची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर योजना. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ वाढविणार. प्रलंबित ८६,०७३ कृषिपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च २०२४ पर्यंत असणार आहे.

राज्यातील बाजार समितींत शेतकऱ्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि जेवणासाठी शिवभोजन थाळी. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार, नगर येथे मुख्यालय. याशिवाय राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ, जन्मानंतर मुलीला ५००० रुपये, पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये, अकरावीत ८००० रुपये, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये मिळणार. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत.

महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ ४ लाखांपर्यंत, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना.

तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार, इयत्ता ५ ते ७ वी : १००० वरून ५००० रुपये, तर ८ ते १० वी : १५०० वरून ७५०० रुपये करण्यात आले आहेत.

Types Of Soil : शेतकऱ्यांनो ‘हे’ आहेत भारतातील मातीचे प्रकार; वाचा आपल्या शेतातील माती नेमकी कोणती ?

Unseasonal Rain : राज्याच्या काही भागात आजपासून पावसाचा अंदाज

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues