Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Weather : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरणार ‘हुडहुडी’! वाचा तुमच्या शहराची काय स्थिती?

0

Maharashtra Weather राज्यात विविध भागात थंडीचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी अजूनही थंडी कमी आहे.

Maharashtra Weather सरासरीपेक्षा तापमानाचा (Temperature) पारा देखील एक ते दोन सेल्सिअसने खाली आला आहे. त्यामुळं कोकणसह मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather मध्य महाराष्ट्रात काय स्थिती :
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. साधारणत: दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमान वाढलं आहे. त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवणार नसल्याचा अंदाज आहे. मात्र, 3 डिसेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

Maharashtra Weather उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढणार :

उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार . या ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. दुसरीकडं संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत.

Maharashtra Weather मराठवाड्याला हुडहुडी :
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. 7 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे.

Maharashtra Weather वाढत्या थंडीचा शेती पिकांना फटका :
राज्यात वाढत्या थंडीचा शेतीच्या पिकांना देखील फटका बसत आहे. वाढत्या थंडीमुळं हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक (Banana Farmer) शेतकरी चिंतेत आहेत. कारण, थंडीमुळं केळीच्या वजनात घट येत असून, केळीची वाढही कमी होत आहे. यामुळं केळीच्या उत्पन्नात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues