Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कमी

0

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून ठीकठिकाणी पावसाने ( Maharashtra Monsoon Update ) विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावली. मात्र आता पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update हवामान स्थिती :

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Maharashtra Monsoon Update ) आला असून, अमृतसरपासून अंबाला, बरेली, मालदा, नागालॅण्ड ते आसामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्राकडे सरकली असून, त्याला लागून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आज कसे असेल हवामान?
IMD Pune पुणे वेधशाळेच्या हवामान (Maharashtra Monsoon Update ) विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 3 सप्टेंबर रोजी गोवा आणि कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues