LIC Policy : तुम्ही LIC पॉलिसी धारक आहात का? मग 24 तारखे आधी करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान
LIC Policy : आजच्या घडीला देशभरात एलआयसीचे करोडो ग्राहक आहेत. या करोडो ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनी तुमच्यासाठी एक विशेष सुविधा राबवत आहे. याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
तुम्ही जर या आधी कधी एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि त्या पॉलिसीचा जर प्रीमियम भरण्यास विसरला असेल, तर आता तुम्हाला ती पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या वतीने ग्राहकांना त्यांची पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुविधा देण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार.., एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम भरला नसलेल्यांना कंपनीच्या वतीने पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुविधा दिली जात आहे आणि यासोबतच तुम्हाला विलंब शुल्कातही मोठी सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला 24 मार्चपर्यंत संधी आहे.
दरम्यान, पॉलिसीधारकाला विलंब शुल्कावर 30% पर्यंत सूट मिळत आहे. तुम्हाला 1 लाखाच्या प्रीमियमवर 25% आणि 3 लाखांच्या प्रीमियमवर 30% सूट मिळत आहे.