एलआयसी ग्राहकांनी केवायसी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्या, नाहीतर फसवणुकीला बळी पडाल!
तुम्ही एलआयसी ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. ऑनलाईन सेवा, खरेदी व्यवहाराचा वाढता कल पाहता फसवणूक करणाऱ्यांनी फसवणुकीचे नवनवे मार्गही शोधले आहेत.
आता फसवणूक करणाऱ्यांनी एलआयसी ग्राहकांना केवायसी तत्काळ अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये दिलेल्या लिंकद्वारे त्वरित केवायसी करण्याचा सल्ला दिला जात आहे. तसे न केल्यास एलआयसीकडून मोठा शुल्क आकारण्याची धमकी दिली जात आहे. एलआयसीने सावध राहण्याचा आणि अशा संदेशांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने एक सार्वजनिक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार सध्या ग्राहकांना बनावट संदेश पाठवत आहेत. केवायसी ताबडतोब करा, अन्यथा एएलआयसी ग्राहकांवर दंड आकारेल, असे संदेशांमध्ये म्हटले जात आहे. असा कोणताही संदेश ग्राहकांना पाठवण्यात आलेला नसून तो खोटा असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की जीवन विमा पॉलिसींसाठी नो युवर कस्टमर (KYC) अपडेट करण्यात अयशस्वी झाल्यास कोणताही दंड आकारला जात नाही.
- Chocolates For Cow : घ्या आता! गाई-म्हशींनाही चॉकलेट हवं! वाढवतेय दुधाचे उत्पादन
- Psychological Tricks : ‘या’ 5 सवयींमुळे इतरांबद्दल द्वेष वाढतो, तुम्हाला तर ही लक्षणे नाहीत ना? वाचा
- Animal Care : ऐकावं ते नवलंच! तुम्ही कधी प्राण्यांची साप्ताहिक सुट्टी ऐकली आहे का? येथे चक्क जनावरांना मिळतो 1 दिवस ‘वीक ऑफ’!
ग्राहकांना सावध करताना एलआयसीने सांगितले की, अशा चेतावणी चुकीची माहिती आहे. एलआयसी ग्राहकांनी अशा कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नये किंवा कोणतीही लिंक उघडू नये. एलआयसीने सांगितले की आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करतो, तसे करण्यात अयशस्वी झाल्यास आमच्याकडून कोणताही दंड आकारला जात नाही.
एलआयसीशी संपर्क कसा साधावा? : ग्राहक (022) 6827 6827 वर फोनद्वारे एलआयसीशी संपर्क साधू शकतो. तुम्ही www.licidia.in या वेबसाइटला ऑनलाईन भेट देऊ शकता. Twitter, Facebook, Instagram आणि YouTube वर LIC India Forever या नावाने अधिकृत सोशल मीडिया खाते आहे, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. कोणत्याही नियुक्त केलेल्या एलआयसी एजंट किंवा शाखेला भेट देऊन योग्य माहिती मिळवा. याप्रमाणे संपर्क तपशील अपडेट करा.
सर्व प्रथम https://merchant.licindia.in/LICEPS/portlets/visitor/updateContact/UpdateContactController.jpf ला भेट द्या. पूर्ण नाव, जन्मतारीख, संपर्क क्रमांक टाका. डिक्लरेशनवर टिक मार्क करा आणि सबमिट करा. पुढील पृष्ठावर पॉलिसी तपशील प्रविष्ट करा आणि ते व्हेरिफाय करा. तुमचे संपर्क तपशील अपडेट केले जातील.
हेही वाचा : LIC : चांगले रिटर्न्स हवे असतील तर वाचा LIC च्या ‘या’ पॉलिसी, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती