Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot : शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? – भाग : 02

0

हळवी कांदा किंवा रांगडा कांदा मार्केटल भाव सापडतात. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरला फुरसुंगी हा गेल्यावर्षीचा साठवणीतला कांदा मार्केटला आणला तर दक्षिण भरतातील आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यातील मोठ्या शहरात म्हणजेचे बेंगलोर, चेन्नई, तिरूअनंतपुरम, कोईमत्तूर अशा शहरात कांद्याचे भाव चढे (वाढते) राहून हमखास पैसे होतात.

आंबा (हापूस) एप्रिलच्या अगोदर मार्केटला आणला तर पैसे तर होतातच, परंतु मे महिन्यात अति उष्णतेने जो साका होतो तो हमखास टाळता येतो.

श्रावण व वैशाखमध्ये कमी पाण्यावर मूग करावा. म्हणजे भाद्रपद महिन्यात व उन्हाळ्यामध्ये हे पैसे वापरता येतात. संत्र्याला बाराही महिने मार्केटला भाव असतो. कमी पाण्याच्या उपलब्धतेत संत्र्याच्या बागा जळत आहेत, कोळशी रोगाने जात आहेत, डायबॅकने खलास होत आहेत. दिंक्याने कोसळत आहेत.

मिरचीची लागवड अशी करावी की. उन्हाळ्यात (मार्च ते मे) मार्केटमध्ये येईल. या पध्दतीने या तंत्रज्ञानाने करावी. म्हणजे या काळात पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांना अनुभव आहे.

हलक्या, मुरमाड, वरकस, पडीक, मध्यम क्षार असलेल्या जमिनीमध्ये कमी पाण्याच्या उपलब्धतेवर शेवग्याची लागवड करावी.

केळीची लागवड मृगातली असो अथवा कांदे बागातली असो, ती एरवी १५ ते १८ महिन्यात येते. टिश्यु कल्चरने १२ महिन्यात येते. एप्रिल- मे ते जुलै – ऑगस्ट (चातुर्मासात) आल्याने शेतकऱ्याला त्याच्या मालाचे निश्चित मनासारखे पैसे मिळतात.

रमजान मध्ये पपईची मागणी जास्त असते. ८-९ महिने आधी पपई लावावी.

टोमॅटोची लागवड मार्च, जून आणि डिसेंबरमध्ये पहिल्या पंधरावड्यात करावी, म्हणजे भाव सापडतात.

काटेरी, भरताची व अंगोरा वांग्याला सर्वसाधारण बाराही महिने भाव असतो. परंतु पावसाळ्यामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवड करू नये. दुष्काळी भागात पावसाळ्यात लागवड केली तरी चालते. पावसाचे प्रमाण २५ ते ५० इंच आहे तेहते वांगी दसर्‍यानंतर करावीत वांग्याला चांगला दर मिळतो.

कोबीचे फेब्रुवारी ते उन्हाळ्यात चांगले पैसे होतात. त्यासाठी दोन महिने अगोदर रोपे लावून लागवड करावी. कोबीचा गड्डा नारळी आकाराचा, हिरवागार, लांबट, गोल एका चौकोनी कुटुंबास पुरेसा होता. हा गड्डा वजनदार असतो, त्यामुळे एका गड्ड्याच्या दोन वेळेस भाज्या व कोशिंबीर होते. कोबी फेब्रुवारीत काढण्यासाठी दिवाळीत लागवड करावी.

फ्लॉवरला ऑगस्ट, फेब्रुवारी आणि उन्हाळ्यामध्ये मागणी असते. फ्लॉवरचा गड्डा पांढराशुभ्र घट्ट आणि आकार आंब्याच्या झाडाच्या चित्रासारखा गोलसर असावा. वजन ३५० ते ६०० ग्रॅम असावे. अशा गड्ड्यांना भाव जादा मिळतो.

मार्केटला मंदीची लाट – जूनला अॅडमिशन असतात, त्यामुळे मंदीचा लाट असते. नंतर गणपती ते दिवाळी ही लाट ओसरते, कारण त्यावेळेस लोकांचे बोनस व आलेल्या शेतीमालाचे पैसे मार्केटमध्ये राहतात. दिवाळीनंतर परत मंदीची लाट डिसेंबर नंतर येते ती टॅक्स भरणे, बँकेचे हप्ते भरणे अशा विविध व्यवहारी बाबींमुळे मे पर्यंत टिकून राहते व त्यामुळे मार्केटमध्ये पैशाची उलाढाल कमी होते.

आठमाही बागायती पाणी साधारण जानेवारी – फेब्रुवारीमध्ये संपते. या काळात भाजीपाला व फळपिकांमध्ये प्रत्यक्षामध्ये तेजी असावयास हवी, तथापि नाही म्हटले तरी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे व असा भाजीपाला पारंपारिक पध्दतीने केल्याने व सर्व साधारण माणसाची क्रयशक्ती कमी असल्याने पैसे होते नाहीत ही वस्तुस्थिती आहे.यावर मात करण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, फळे अन्नधान्ये जर निर्माण केले तर ती देशांतर्गत शहरी व निमशहरी मार्केटमध्ये यासाठी प्रचंड वाव आहे. कारण पारंपारिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालापेक्षा नैसर्गिक शेती मालास देशात दुप्पट तर प्रदेशात ४ ते ५ पट भाव मिळू शकतो. नैसर्गिक भाजीपाला पिकवण्यासाठी देशी बियाण्यांचा व रोपांचा वापर झाल्यास तो एक दुग्धशर्करा योग ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues