Take a fresh look at your lifestyle.

Kitchen Tips : किचन मधील काम झटपट होण्यासाठी काही उपयुक्त किचन टिप्स

0

Kitchen Tips : किचनमध्ये काम करताना बऱ्याच अश्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, आणि आपण आपली काम वाढवून ठेवतो. पण तुम्हाला आज आम्ही काही अश्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या किचनमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जाणार आहेत आणि किचनमध्ये तुमचा अधिकचा वेळ वाया जाणार नाही.

काय आहेत या किचन टिप्स जाणून घ्या अत्यंत थोडक्यात…

1. साखरेच्या डब्ब्यात बऱ्याचदा मुंग्या लागतात साखर चिकट होते अश्यावेळी साखरेच्या डब्ब्यात काही लवंग टाकून झाकण घट्ट लावून ठेवा

2. बाजारातून आणलेली केळी एका दिवसात काळी पडू लागतात अश्यावेळी केळ्यांच्या देठाला सिल्व्हर फॉईल लावून ठेवावा. असं केल्यास केळी जास्त दिवस टिकतात.

3. कुकीज किंवा बिस्किट्स बरणीत भरून ठेवताना त्यात संत्राची साल घालून ठेवावं कारण साखरेमुळे काही काळानंतर हे कुकीज कडक होऊ लागतात.

4. सूप किंवा भाज्यांवर जास्तीचं तेल जमा होतं, ते तेल शरीरासाठी हानिकारक असतं…अश्यावेळी एका भांड घ्या त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि ते भांड भाजी किंवा सूपवरून फिरवा अश्याने भांड्याच्या तळाशी ते तेल चिकटेल आणि वेगळं होईल .

5. संत्री मोसंबी लिंबू सारखी फळं कापडात गुंडाळून मायक्रोवेव्हमध्ये ठेवावं अश्याने साल काढणं सोपं होऊन जातं.

6. चीझ, बटर व्यवस्थित किसण्यासाठी आधी ते फ्रीझमध्ये ठेवा

7. दूध उतू जाऊ नये म्हणून ते उकळताना त्यावर लाकडी चमचा ठेवावा

8. चपात्या काळ्या पडू नये म्हणून पीठ मळल्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues