Take a fresh look at your lifestyle.

Health Tips : तुम्ही वारंवार डोळे चोळताय? मग होऊ शकते तुमचे ‘हे’ गंभीर नुकसान

0

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. डोळ्यांना खाज सुटणे किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे डोळे चोळावे लागतात. पण डोळे चोळायला हवेत? असे केल्याने आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात का? खरंतर, डोळे चोळणे म्हणजे संसर्ग, ऍलर्जी आणि डोळ्यांशी संबंधित इतर अनेक समस्या असू शकतात.

1)  कॉर्नियाचे नुकसान : डोळ्यांना सतत चोळल्याने कॉर्नियावर ओरखडे येऊ शकतात. यामुळे दृष्टी समस्या आणि अंधत्वाची समस्या उदभवू शकते.

2)  संसर्ग : डोळे चोळल्याने डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा गुलाबी डोळा यांसारखे संक्रमण होऊ शकते. या संसर्गामुळे डोळ्यांना जास्त खाज सुटते, डोळ्यातून पाणी येऊ लागते.

3) केराटोकोनस : डोळ्यांचा कॉर्निया पातळ होऊ लागल्यावर केराटोकोनसची समस्या उद्भवते. यामुळे डोळ्यांमध्ये अस्पष्टता येते.

4 )  ऍलर्जी : डोळ्यांना जास्त चोळल्याने ऍलर्जी होऊ शकते. ब्लेफेराइटिसमुळे पापण्यांना सूज येते कारण तेल ग्रंथी बंद असतात.

5)  डार्क सर्कल : डोळे सतत चोळल्याने ज्या लोकांच्या त्वचेचा रंग गडद असतो त्यांना डार्क सर्कलची समस्या निर्माण होते.

6 )  डोळे लाल होतात : डोळ्यांना जास्त चोळल्याने केशिका फुटू शकतात आणि जखमा होऊ शकतात. यामुळे तुमचे डोळे लाल होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी कृषिदूत केवळ आणि केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues