Take a fresh look at your lifestyle.

राज्यात लवकरच 10000 पदांसाठी ग्रामसेवक भरती होणार; जाणून घ्या तारखा

0

सध्याच्या शिंदे- फडणवीस सरकारकडून राज्यात विविध प्रकारच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या भरतीमुळे मोठ्या प्रमाणावर सर्वांनी या संधीचे सोने करावे अशी सध्याची स्थिती आहे. काही दिवसातच पोलीस भरती होणार असून यानंतरच राज्यात तलाठी भरती होणार असल्याचे राज्य सरकारने सांगतले आहे. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण असून या आलेल्या संधीचे सोने करण्याची मोठी संधी इच्छुक उमेदवारांसाठी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक या पदासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्यात दहा हजार पदांसाठी भरती होणार असून राज्याच्या ग्रामविकास विभाग सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामसेवक भरतीचे संभाव्य वेळापत्रक :-

▪️ 1 ते 7 फेब्रुवारी 2023 – पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
▪️ 22 फेब्रुवारी 2023 – उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
▪️ 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 – अर्जाची छाननी

▪️ 2 ते 5 मार्च 2023 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
▪️ 6 ते 13 एप्रिल 2023 – पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाईल.
▪️ 14 ते 30 एप्रिल 2023 – ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होईल.
▪️ 1 मे ते 31 मे 2023 – अंतिम निकाल व पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश

दरम्यान, सविस्तर माहितीसाठी राज्य शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचा सांकेताक क्रमांक 202211151123036720 असा आहे.

नोकरी बदलण्याचा विचार करताय? ‘हे’ महत्त्वाचे प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues