Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी : आता ग्राहकांना मिळणार 68 लिटर मोफत पेट्रोल अन् डिझेल

0

मागील काही दिवसांपासून सुरु असेल्या पेट्रोल-डिझेलच्या चढ-उतारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण करून टाकले आहे. देशातील महागाई प्रचंड वाढली असून, यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांशी ठिकाणी अजूनही पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत.

परंतु, आता वारंवार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चक्क ग्राहकांना 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळण्याची संधी नागरिकांसाठी मिळणार आहे.

कशे मिळणार 68 लिटर मोफत इंधन?

68 लिटर पेट्रोल मोफत मिळवण्यासाठी तुमच्याकडे इंडियल ऑईल सिटी क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. या कार्डच्या माध्यामातून यूजर वर्षाला 68 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत मिळवू शकतो. इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डचे हे इंधन क्रेडिट कार्ड आहे. कार्ड स्वॅप केल्यानंतर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) रिडीम करून ग्राहक दरवर्षी 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतील.

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

▪️ 1. इंडियन ऑइल पंपांवर टर्बो पॉइंट्सची पूर्तता करून दरवर्षी ग्राहक 68 लीटर पर्यंत मोफत इंधन मिळवू शकतो.
▪️ 2. इंडियन ऑइल पंपांवर 1% इंधन अधिभारदेखील माफ केला जातो.
▪️ 3. इंडियन ऑइल पंप्सवर खर्च केलेल्या 150 रुपयांवर प्रति 4 टर्बो पॉइंट मिळवता येऊ शकतात.
▪️ 4. कार्डद्वारे किराणामाल आणि सुपरमार्केटमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक रु. 150 साठी 2 टर्बो पॉइंट्स मिळवता येऊ शकतात.
▪️ 5. कार्डद्वारे इतर गोष्टींवर खर्च केलेल्या प्रत्येक रु. 150 वर 1 टर्बो पॉइंट मिळतो.

टर्बो पॉइंट्सला कसे करावे रिव्हर्ड?

▪️ टर्बो पॉइंट्सला अनेक प्रकारे रिडीम केले जाऊ शकते परंतु इंडियन ऑइल पंपांवर रिडीम केल्याने जास्तीत जास्त फायदा मिळतो.
▪️ इंडियन ऑइल पंपांवर रिडमशन रेट– 1 टर्बो पॉइंट = 1 रुपये.
▪️ MakeMyTrip, EaseMyTrip, IndiGo, goibibo, IndiGo, Premiermiles.co.in आणि Yatra.com वर रिडीमशन रेट- 1 टर्बो प्वाइंट = 25 पैसे.
▪️ BookMyShow, Airtel, Jio, Vodafone आणि Shopper Stop वर रिडीमशन रेट- 1 टर्बो प्वाइंट = 30 पैसे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues