Take a fresh look at your lifestyle.

Ganga Vilas Cruise : पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या क्रूझवर एका दिवसासाठी मोजावे लागणार तब्बल ‘एवढे’ रुपये

0

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला (Ganga Vilas Cruise) हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. यानंतर ही क्रूझ वाराणसीच्या रामनगर बंदरावरून पुढच्या प्रवासाला रवाना झाली. मिळलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात लांब असेल्या या गंगा विलास क्रूझवर रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजसह फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. काय आहे या क्रूझचे वैशिष्ट कसा असेल याचा प्रवास? जाणून घ्या सविस्तर

‘एमव्ही गंगा विलास’ची वैशिष्ट्ये
‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ 62.5 मीटर लांब तर 12.8 मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये 40 हजार लिटरची इंधन टाकी आणि 60 हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून10 ते 12 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करणार आहे. तसेच या क्रूझ सेवेसाठी 68 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचीही माहिती आहे.

प्रवाशांना या क्रूझवर किती पैसे मोजावे लागणार?

या क्रूझवर प्रवासाठी प्रवाशांना एका दिवसासाठी तब्बल 50 हजार रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे ही क्रूझ आगामी दोन वर्षांसाठी बूक झाली असून प्रवाशांनी बुकींग रद्द केले, तरच वेटींग लिस्टमधील प्रवाशांना तिकीट मिळेल, अशी माहिती अंतारा रिव्हर क्रूझचे मुख्यकार्यकारी अधिकारी राज सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान, रिव्हर क्रूझमुळे स्थानिक लोकांसाठी येत्या काळात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत तसेच नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या शेजारील देशांना त्याचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues