Take a fresh look at your lifestyle.

FIFA Best Awards 2023 : लिओनेल मेस्सीने पुन्हा जिंकले FIFA बेस्ट प्लेयरचे अवॉर्ड

0

FIFA Best Awards 2023 : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. (FIFA 2023) तर स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासला (Alexia Putelas) सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. लिओनेल मेस्सीने फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेला मागे टाकले आहे. मेस्सीला सर्वाधिक मते मिळाली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू मेस्सीला दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. याआधी 2019 मध्ये मेस्सीने हे विजेतेपद पटकावले होते.

मेस्सीने पटकावले विजेतेपद :
फिफाचा सर्वोत्तम खेळाडू होण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. त्यात लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे आणि करीम बेंझेमा यांचा समावेश होता. पण मेस्सीने मतदारांची मने जिंकली आणि तो फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला सर्वाधिक 52 गुण मिळाले. तर फ्रान्सच्या एम्बाप्पेला ४४ गुण मिळाले. फ्रेंच खेळाडू करीम बेन्झेमाला 34 गुण मिळाले. प्रशिक्षक, कर्णधार, मीडिया आणि चाहत्यांनी लिओनेल मेस्सीला पसंती दिली.

कसा निवडला गेला सर्वोत्तम खेळाडू :
फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारांसाठी मतांद्वारे खेळाडूंची निवड केली जाते. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, मीडिया आणि फिफा सदस्य देशांचे चाहते या पुरस्कारांसाठी मतदान करतात. यावेळी सर्व 211 देशांच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी 6 पुरस्कारांसाठी मतदान केले. फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठी मेस्सीच्या समर्थनार्थ सर्वाधिक मते पडली.

अलेक्सिया पुटेलेस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू :
फिफाच्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून स्पेनच्या अलेक्सिया पुटेलेसला निवडण्यात आले आहे. पुटेलसने अमेरिकेच्या एलेक्स मॉर्गन आणि इंग्लंडच्या बेथ मीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. पुतेलस 50 गुण मिळाले. तर मॉर्गनला 37 आणि बेथ मीडला 37 गुण मिळाले.

हे खेळाडू सर्वोत्तम खेळाडूही ठरले :
FIFA 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक एमिलियानो दिबू मार्टिनेझ आणि सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर मेरी एर्प्स यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकासाठी लिओनेल स्कालोनी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकासाठी सरिना विग्मन यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट चाहत्याचा पुरस्कार अर्जेंटिनाच्या चाहत्यांना गेला आहे. तर सर्वोत्कृष्ट फेअर प्लेचा पुरस्कार लुका लोचाशविली यांना मिळाला आहे. या वेळी महान फुटबॉलपटू पेले यांना विशेष आदरांजली वाहण्यात आली.

FIFA 2023 पुरस्कार विजेते :
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू – लिओनेल मेस्सी, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू – अलेक्सिया पुटेलास, सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक – एमिलियानो दिबू मार्टिनेझ, सर्वोत्कृष्ट महिला गोलरक्षक – मेरी इर्प्स, सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक – लिओनेल स्कालोनी, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक – सरिना विग्मन, सर्वोत्कृष्ट पुस्कास पुरस्कार – मार्सिन ओलेक्सी, सर्वोत्कृष्ट चाहता पुरस्कार – अर्जेंटिना चाहते, सर्वोत्कृष्ट फेअर प्ले पुरस्कार – लुका लोचाशविली, विशेष श्रद्धांजली – पेले.

Education : ‘हे’ आहे या बॉलीवूड अभिनेत्रींचे शिक्षण; जाणून घ्या तुमच्या आवडत्या अभिनेत्रीची शैक्षणिक पात्रता

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues