Take a fresh look at your lifestyle.

शेतकर्‍यांसाठी सरकारने सुरु केल्या आहेत ‘या’ महत्वाच्या योजना!

0

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना चालवल्या जात असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण कृषी यंत्रावर मिळणाऱ्या अनुदानाविषयी जाणून घेणार आहोत. कारण, कृषी यंत्रे महाग आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने खालील कृषी मशीनरी सब्सिडी योजना सुरू केल्या आहेत.

  1. राष्ट्रीय कृषी विकास योजना : ही एक राज्य योजना असून याअंतर्गत शेतकऱ्यांना १००% अनुदान दिले जाते. ही योजना केंद्र सरकारने 29 मे 2007 रोजी सुरू केली होती. या योजनेचा हेतू कृषी हवामान, नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन शेती विकसित करणे हा आहे. या अंतर्गत, फार्म मशीनीकरण, प्रगत आणि महिला अनुकूल उपकरणे, अवजार यासाठी मदत दिली जाते.
  2. कृषी यांत्रिकीकरणावर उप-मिशन : ही योजना छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली गेलीय. याद्वारे शेतकरी सशक्त व्हावे यासाठी भारत सरकारकडून कृषी यांत्रिकीकरणाचे विविध उपक्रम जसे की, कस्टम हायरिंग सेंटर, कृषी यंत्रणा बँका, हाय-टेक हबची स्थापना आणि वितरणा आदीसाठी निधी जारी होतो.
  3. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन : याअंतर्गत कृषी उत्पादकता सुधारली जाते. याचा मुख्य उद्देश म्हणजे नवीन कृषी यंत्रे खरेदी करण्याऐवजी जुनी यंत्रे अधिक चांगली बनवणे. कारण कृषी मशीनरीचा सातत्याने वापर केल्याने काही कमतरता येतात. अशा परिस्थितीत तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत कृषी यंत्रणेचा लाभ घेऊ शकता.
  4. नाबार्ड कर्ज : याअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर 30 टक्के पर्यंत तर इतर कृषी यंत्रांसाठी 100 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. अशाप्रकारे, कृषी यंत्रे शेतकऱ्यांना शेतीसाठी खूप सहज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.

कृषी यंत्रांवर अनुदान कसे मिळवायचे? : या अनुदानाची प्रक्रिया दोन प्रकारे हाताळली जाते. पहिले रोख अनुदान आणि दुसरे अप्रत्यक्ष अनुदान. प्रत्यक्ष रोख रकमेच्या स्वरूपात मिळणारे अनुदान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, तर अप्रत्यक्ष अनुदान कृषी उत्पन्न करमुक्त आहे.

अनुदान मिळवण्यासाठी पुढील महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मतदार कार्ड, बँकेकडून प्रत (स्टेटमेंट), खात्याचे तपशील, पॅन कार्ड, संपर्क माहिती, नाव आणि जन्मतारीख, अर्ज आणि पेमेंट पावती इ.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues