Take a fresh look at your lifestyle.

Crop Nutrient Deficiency : अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय

0

नत्र :
लक्षणे : झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते.
उपाय : १ % युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम युरिया १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).

स्फुरद :
लक्षणे : पाने हिरवट, लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते.
उपाय : १ % डाय अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी. (१०० ग्रॅम D-AP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).

पालाश :
लक्षणे : पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
उपाय : ०.५ % सल्फेट ऑफ पोटॅश ची फवारणी करावी. (५० ग्रॅम SOP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).

गंधक :
लक्षणे : झाडांच्या पानांचा मुळचा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.
उपाय : ०.२ % फेरस सल्फेट ची फवारणी करावी. (२० ग्रॅम फेरस सल्फेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

लोह :
लक्षणे : शेंडयाकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो व झाडांची वाढ खुंटते.
उपाय : ०.२ % चिलेटेड लोहाची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड लोह १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

जस्त :
लक्षणे : पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.
उपाय : ०.२ % चिलेटेड झिंक ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड झिंक १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

Jugaad Of Spray Machine : आता फवारणीसाठी स्प्रे मशीन चालणार देसी जुगाड , जाणून घ्या त्याची खासियत

मंगल :
लक्षणे : पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पर्ण फिक्कट होऊन गळते.
उपाय : ०.२ % चिलेटेड मंगल ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड मंगल १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

तांबे :
लक्षणे : झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते. खोडांची वाढ कमी होते, पाने गळतात.
उपाय : ०.४ % मोरचूदची फवारणी करावी. (४० ग्रॅम मोरचूद १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

बोरॉन:
लक्षणे : झाडांचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. फुलगळ होते व फळांना तडे जातात.
उपाय : ०.२ ते ०.३ % बोरिक ऍसीड पावडरची फवारणी करावी. (२० ते ३० ग्रॅम बोरिक ऍसीड १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)

मोलाब्द :
लक्षणे : पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.
उपाय : ०.०१ % सोडियम मॉलीब्डेट ची फवारणी करावी. (०.५ ते १.० ग्रॅम सोडियम मॉलीब्डेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).

Types Of Soil : शेतकऱ्यांनो ‘हे’ आहेत भारतातील मातीचे प्रकार; वाचा आपल्या शेतातील माती नेमकी कोणती ?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues