Take a fresh look at your lifestyle.

Business ideas : ही शेती ठरते शेती व्यवसायासाठी वरदान!

0

Business ideas : पारंपारिक शेती पध्दतीमध्ये काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहेत. पिकाबरोबर तण वाढू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव पीकावर होऊ नये म्हणून पीकाला अच्छादन केले जाणारे मल्चिंग शेती व्यवसायात वरदान ठरत आहे. शेतात पॉलिथिन कागद आच्छादल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण राहते व तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहते. यामुळे पीक वाढीला फायदा होतो. तसेच किडीचा प्रादुर्भाव होत नाही. शेतात मल्चिंग पेपर अंथरल्यावर पिकाला पाणी कमी प्रमाणात लागते.

मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्चलेयिंग यंत्राचा वापर केल्याने वेळ, मजूर व श्रमात बचत होते. यंत्राच्या वापरामुळे बेसल डोस देणे गादी वाफा तयार करणे, लॅटरल टाकणे, पेपर अंथरूण कडेने माती लावणे ही कामे करता येतात. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च हा 32000 रुपये असून त्यावर 50 टक्के अनुदान मिळते. यानुसार जास्तीत जास्त हेक्‍टरी 16 हजार रुपये अनुदान मिळू शकते. मात्र शेतात मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues