
BCCI Annual Contract List : BCCI कडून टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर; जाणून घ्या तुमच्या आवडत्या खेळाडूला किती मिळणार मानधन
BCCI Annual Contract List : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुष संघासाठी वार्षिक करार जाहीर केला आहे. केंद्रीय कराराच्या एकूण चार श्रेणींमध्ये एकूण 26 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणी A+, A, B आणि C आहेत. बीसीसीआयच्या या केंद्रीय करारात आपल्या दमदार कामगिरीचे बक्षीस रवींद्र जडेजाला मिळाले आहे. जडेजाचा A+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयनं जाहीर केलेल्या या यादीत काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे, तर काहींचं डिमोशन. तुमच्या आवडत्या खेळाडूला किती मिळणार मानधन जाणून घ्या सविस्तर…
BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं?
A+ (7 कोटी)
रोहित शर्मा
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
रवींद्र जडेजा
A गट (5 कोटी)
हार्दिक पांड्या
आर अश्विन
मोहम्मद. शमी
ऋषभ पंत
अक्षर पटेल
B गट (3 कोटी)
चेतेश्वर पुजारा
केएल राहुल
श्रेयस अय्यर
मोहम्मद सिराज
सूर्यकुमार यादव
शुभमन गिल
C गट (1 कोटी)
उमेश यादव
शिखर धवन
शार्दुल ठाकूर
इशान किशन
दीपक हुडा
युझवेंद्र चहल
कुलदीप यादव
वॉशिंग्टन सुंदर
संजू सॅमसन
अर्शदीप सिंग
केएस भारत