Take a fresh look at your lifestyle.

Agriculture Tips : जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? व देखभाल कशी कराल?

0

Agriculture Tips : जमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या 25 ते 30 वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. तर वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होतात. एवढेच नव्हे तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.

त्यासाठी आजच्या लेखात जाणून घेऊया जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? व त्याची देखभाल कशी करावी.. त्यासाठी हि बातमी संपूर्ण वाचा

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळणे महत्वाचे आहे.

जमिनीची सुपीकता चांगली ठेवण्यासाठी गांडूळ खते व जैविक खतांचा उपयोग शेत जमिनीत केल्यास अधिक फायदा होतो.

कृषी तज्ज्ञांकडून शेतीचे माती परीक्षण करून घेणे फायदेशीर ठरते. माती परीक्षण केल्यास जमिनीचे गुणधर्म व दोष याबद्दल माहिती मिळते, व त्यावर वेळीच उपाय योजना कराव्यात.

जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता जमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या सूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता व पातळी टिकून राहते.

जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता सेंद्रिय खताचा वापर गांडूळ खताचा वापर तसेच माती परीक्षण करून रासायनिक खताचा वापर करणे, पिकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

 शेतजमिनीमध्ये जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues