Take a fresh look at your lifestyle.

Most ecpensive whiskey in world : ‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या दारू, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

0

most ecpensive whiskey in world : तुम्हाला वाटत असेल की, सोनं ही जगातील सर्वात महागडी वस्तू असेल. पण तुम्ही चुकताय… जगात अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या सोन्याहून हजारपटीने महाग आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या दारूविषयी आणि त्यांच्या किमतीविषयी माहीती देणार आहोत. काहींच्या किमती लाखामध्ये तर काहींच्या कोटीमध्ये आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटू देऊ नका.

Tequila Ley .925 : सर्वात महागड्या दारूमध्ये पहिल्या स्थानी टकीला ले.925 हि दारू आहे. या दारूच्या बाटलीची किंमत सर्वात महाग आहे. या बाटलीवर 6400 हिरे लावलेले आहेत. हि दारू मेक्सिकोमध्ये लाँच करण्यात आली आहे. मात्र अजून हि दारू कोणीही खरेदी करू शकलं नाही. या दारूची किंमत 25.4 कोटी रूपये आहे.

Diva Vodka : सर्वात महागड्या दारूंमध्ये दिवा वोडका ही वाइन दुसऱ्या क्रमांकावर येते. या दारूच्या प्रत्येक बाटलीच्या मध्यभागी एक वेगळ्या प्रकारचा साचा असतो. त्यामध्ये स्वारोवस्की क्रिस्टल्स ठेवलेले असतात. ते पेय गार्निश करण्यासाठी वापरले जातात. या बाटलीची किंमत 7 कोटी 30 लाख रुपये आहे.

Amanda De Brignac Midas : अमांडा डी ब्रिग्नाक मिडास ही वाईन तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे जगातील सर्वात महाग शॅम्पेन मानले जाते. या शॅम्पेनच्या बाटलीचा आकार खूप मोठा आहे. या शॅम्पेनची किंमत 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त आहे. ती दिसायलाही खूप सुंदर आहे.

Dalmore 62 : Dalmore 62 ही व्हिस्की चौथ्या क्रमांकावर आहे. ही जगातील सर्वात महागडी व्हिस्की मानली जाते. या व्हिस्कीच्या आत्तापर्यंत फक्त 12 बाटल्या बनवल्या गेल्या आहेत. या व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत 1 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त आहे.

Penfolds Ampoule : Penfolds Ampoule ही रेड वाईन पाचव्या क्रमांकावर आहे. ही सर्वात महागडी रेड वाईन आहे. ही रेड वाईन पेन सारख्या बाटलीमध्ये येते. या रेड वाईनची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues