Take a fresh look at your lifestyle.

Agribusiness ‘हे’ जोडव्यवसाय करा; लाखोंची उलाढाल फिक्स!

0

Agribusiness शेतकऱ्याला शेती पलीकडे शेतीशी निगडीत व्यवसाय खऱ्या अर्थाने सक्षम होण्यास मदत करतात. हे छोटे वाटणारे जोड व्यवसाय लाखोंचे उत्पन्न कमवून देऊ शकता. चला, असाच काही जोड व्यवसायांविषयी आज जाणून घेऊयात…

  1. डेअरी व्यवसाय : Dairy Business हा असा सर्वाेत्तम व्यवसाय आहे जो आयुष्यभर चालणारा आहे. यामधून शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जनावरे असतील तर त्याला त्यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी भांडवल कमी असेल तरी तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.
  2. मत्स्य पालन : fish rearing business आजघडीला बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे शेततळे आहेच. याच तळात तुम्ही मत्स्य शेती करून चांगला फायदा कमावू शकतात. जागा कमी असेल तरी हा व्यवसाय चांगले उत्पन्न देतो. साधारणतः १ एकराच्या शेततळ्यात मत्स्य शेती केली तर ९ ते १० लाख रूपये कमवू शकता. विशेष म्हणजे या शेतीसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता.
  1. शेळीपालन : shelipalan वर-वर सहज आणि सोपा वाटणारा हा कमी खर्चाचा व्यवसाय जास्त नफा देणारा आहे बरं का. विशेष म्हणजे यासाठी जास्त मंजूराचीही गरज भासत नाही. तुमच्याकडे थोडी शेती असेल तरी तुम्ही हा व्यवसाय करू शकता. अगदी सामान्य परिस्थितीमध्ये शेळ्या जगत असल्याने यात नुकसान फार कमी असते. तसेच शेळीपालन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडूनही अनुदान देखील मिळत असते.
  2. मेंढी पालन : sheep rearing या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मेंढीची मागणी मांस आणि दुधासाठी असते. तसेच मेंढीपासून मिळणारे लोकर देखील बाजारात मोठा भाव खात असल्याने यातून किंमतही चांगली मिळते.

वरील व्यवसाय सोपे वाटत असले तर बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गरजेचे आहेत. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.