Take a fresh look at your lifestyle.

उसाप्रमाणे दुधाला एफआरपी मिळणार?

0

संकट काळात दूध संघाने दुधाचे दर पाडल्याने दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. अशात शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.

ती म्हणजे राज्य सरकार दुधाला एफआरपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करणार आहे. सध्या राज्यात उसाला आधारभूत किंमत देणारा कायदा आहे. जर दुधाला एफआरपी मिळाली तर शेतकरी नक्कीच सुखावेल.

एका बैठीकीत दुधाला एफआरपी देणारा कायदा तातडीने केला जाईल अशी माहिती दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. या बैठकीला दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, खासगी आणि सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. अजित नवले यांनी काय मागणी केली?
● राहुरी कृषी विद्यापीठाच्या अभ्यासाचा विचार केला तर विद्यापीठाच्या मध्ये उत्पादन खर्च 27 ते 29 रुपये प्रति लिटर आहे. 15 टक्के फायदा गृहीत धरला तर 35 रुपयांच्या पुढे दुधाचे दर निघतात.
● सूत्रानुसार पंधरा टक्के नफा धरून आधारभूत किंमत असावी.

Leave A Reply

Your email address will not be published.