Trending News : ‘या’ देशात फिरायला जाण्याचा करा प्लॅन, स्थानिक सरकार करणार तुमचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च!!
Trending News : जर तुम्ही परदेशात फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते. कारण आता एका देशातील सरकारने परदेशी पर्यटक जर त्यांच्या देशात फिरण्यासाठी गेले तर त्यांना पैसे देण्याची भन्नाट ऑफर सुरु केली आहे. पर्यटकांना पैसे देण्याची ऑफर जाहीर करणाऱ्या देशाचे नाव तैवान आहे. त्यामुळे तुम्ही जर तैवानला भेट दिली तर तुम्हाला 1-2 हजार नव्हे 10 हाजारांहून अधिक रुपये खर्चयसाठी मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तैवान सरकारची नक्की ऑफर काय आहे..
आपल्याला माहिती आहे कि कोरोना महामारी मुळे मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगाच्या पर्यटन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक देशांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. अशा परिस्थितीत तैवान सरकारने आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी तैवान सरकारने पर्यटकांसाठी एक उत्तम ऑफर सुरू केली आली आहे. ज्यामध्ये तैवान सरकारने त्यांच्या देशाला भेट देणाऱ्या 5 लाख पर्यटकांना सुमारे 13 हजार 600 रुपयांचा हँडआउट देणार आहे. या व्यतिरिक्त, तैवान सरकार 90 हजार टूर ग्रुप्सना 54 हजार 500 पर्यंतचा भत्ताही देणार आहे. पर्यटक या हँडआउट्सचा वापर निवास, वाहतूक आणि इतर प्रवासासाठी खर्च करु शकतात. पर्यटकांना हे हँडआउट(पैसे) डिजिटल पद्धतीने मिळणार आहेत.