Take a fresh look at your lifestyle.

Dictator : हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर मुलांना आणि पालकांना होईल 6 महिन्याचा कारावास; या देशाचे अजब फर्मान!

0

Dictator : हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर मुलांना आणि पालकांना होईल 6 महिन्याचा कारावास; या देशाचे अजब फर्मान!

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) नेहमीच विचित्र निर्णयांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा किम जोंग उनने उत्तर कोरियाच्या जनतेसाठी नवं फर्मान जारी केलं आहे. या कायद्यानुसार उत्तर कोरियात मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार.. हुकुमशाह किम जोंग उनने उत्तर कोरियात एक नवा कायदा लागू केला असून या कायद्यानुसार मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर एखादा मुलगा हॉलिवूड चित्रपट बघताना आढळला तर त्याच्या पालकाला सहा महिने लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच मुलाला पाच वर्षाच्या तुरुंगवास भोगावा लागणार आहे. हॉलिवूड चित्रपटामुळे मुलं समाजविरोधी बनत असून त्यांच्यावर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. के-ड्रामा नावाने ओळखले जाणारे कोरियन चित्रपट पाहणे आणि त्यांचा प्रसार करणे हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues