Budget 2023 : अर्थसंकल्प सादर होण्याआधी सर्वसामान्य जनतेला मोदी सरकारकडून ‘या’ 10 अपेक्षा..!!
अवघ्या काही तासातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून काही तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला लागून राहिले आहे. तर दुसरीकडे अर्थसंकल्पातील घोषणांमध्ये सर्वांच्या नजरा मदतीच्या सरकारी योजनांकडे लागल्या आहेत.
त्याचवेळी, कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, याचीही लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर आयकरात सवलत मिळाल्यानंतर, बहुतांश लोकांना स्वस्त किंवा अधिक महाग असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहेत.
अर्थसंकल्पातून सर्वसामान्य 10 अपेक्षा
१) 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचे हे अखेरचे बजेट आहे. त्यामुळे देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा असतील. महागाईने त्रासलेल्या जनतेला काही खास गिफ्ट मिळेल अशी आशा आहे. सरकार काही गरजेच्या गोष्टींवर कर कपात करू शकते.
२) गेल्या 9 वर्षापासून आयकर मर्यादेत वाढ करण्यात आलेली नाही. नोकरदार वर्गाला यावेळी आयकर मर्यादेत सूट मिळेल अशी आशा आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सध्या असलेली 2.5 लाखांची मर्यादा वाढवतील हा हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
३) लोकांची अपेक्षा आहे की मोदी सरकार त्यांच्य अखेरच्या पूर्ण बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती कमी करेल.
४) ज्येष्ठ नागरिकांना अपेक्षा असेल की त्यांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी सूट पुन्हा मिळेल. तसेच त्यांच्या आरोग्या संदर्भात काही घोषणा केली जाईल
५) महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयबीआयने या वर्षी रेपो रेटमध्ये वाढ केली होती. ज्यामुळे बँकांनी व्याद दरात वाढ केली होती. आता अर्थसंकल्पात यात काही सवलत मिळेल याची अपेक्षा असेल.
६) किसान सम्मान निधीच्या रक्कमेच वाढ होण्याची आशा आहे. ही रक्कम ८ हजार होऊ शकते. सध्या ही रक्कम ६ हजार इतकी आहे.
७) बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रा संदर्भात मोठी घोषणा होण्याची आशा आहे. सरकारी रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा करण्या बरोबरच आरोग्यासाठीच्या तरतूदीमध्ये ५ टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते.
८) युवकांना रोजगारासंदर्भात ठोस घोषणा होण्याची आशा असेल.
९) देशात आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिलासा मिळण्याची आशा आहे. शैक्षणीक कर्ज स्वस्त होईल का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल.
१०) या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिसाला देणाऱ्या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा आहे. गेल्या काही वर्षापासून प्रवासावरील खर्च वाढत चालला आहे. अशात हा खर्च कमी होईल अशी अपेक्षा असेल.