Take a fresh look at your lifestyle.

नवीन व्यवसाय सुरु करताय? या गोष्टी नक्की वाचा नाहीतर होईल मोठी अडचण

0

कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरूवात म्हटलं की, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक. ही झाली नाण्याची एक बाजू. या व्यतिरिक्तही अनेक बाजू आहेत. जर आपणांस नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोण-कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर नजर टाकूयात…

1) सर्वात प्रथम तुमच्या हातात किती व कोणत्या प्रकारची साधनसंपत्ती आहे याची तुमच्याकडे संपूर्ण माहिती असायला हवी.

2) व्यवसाय म्हटलं की, भांडवल सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट. कारण भांडवलावरच आपल्या व्यवसायाची व्याप्ती ठरत असते. म्हणजेच व्यवसायाची जागा, कामासाठी लागणारी माणसं, कंपनी नोंदणी इ. गोष्टी जोडलेल्या असतात.

3) जर भांडवलाची पुरेशी उपलब्धता होत नसेल तर तुम्ही विविध ठिकाणी व्यवसायासाठी मिळणार्‍या कर्ज सुविधांचा लाभ घेऊ शकता. यानंतर वेळ आणि पैशांचे योग्य नियोजन करा. जेणेकरून पैसे हातात पडल्यावर त्याचे योग्य पद्धतीत मूल्यमापन होईल.

4) व्यवसाय करताना आवश्यक असणार्‍या गुणांचा अभ्यास करा. जसे की संयम, जिद्द, चिकाटी, लवचिकता, नवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, अपयशाची स्विकारण्याची तयारी. तसेच स्वत:मधील गुणांना ओळखा. स्वत:चा कृती आराखडा तयार करा. जेणेकरून प्रत्यक्ष कार्यवाही करताना त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

5) कृपया करून इतरांच्या आयडिया चोरू नका. नवं आणि आकर्षक काहीतरी आपल्या ग्राहकाला देणे ही तुमची जबाबदारी समजा. ग्राहकांना हवंय ते देण्यासाठी व्यवसायात लवचिकता ठेवा.

6) आपल्या उत्पादन अथवा सेवेचं मार्केट चॅनेल कसं आहे समजून घ्या. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मार्केटमध्ये तुमचं उत्पादन हे ग्राहकांना आकर्षून घेण्यास यशस्वी ठरलं पाहिजे. यासाठी प्रभावी जाहिरात आणि प्रमोशन करा.

7) स्वत:च्या उत्पादनाचं टार्गेट कस्टमर ओळखा. त्यानुसार तुमच्या उत्पादनाची नियोजनबद्ध आणि परिणामकारक मार्केटिंग करा. त्याशिवाय बदलत्या मार्केटनुसार स्वत:ला अपडेटेड ठेवा.

8) आपल्या उत्पादन अथवा सेवेचा विचार करत असताना पहिल्या दिवसापासूनच त्याच्या ब्रँण्डींगचा विचार करायला सुरुवात करा. तसेच विक्रीपश्‍चात सेवा कशी देता येईल, याचाही विचार करा.

Adani Group Companies IPO: अदानी ग्रुप आणणार या 5 मोठ्या कंपन्यांचा IPO

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues