आनंदवार्ता! ‘किसान सन्मान’चा 10 हप्ता लवकरच जमा होणार
पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लवकरच 10 व्या हफ्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची आनंदवार्ता मिळू शकते. कारण सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जाहीर करण्याची तारीख नक्की केली आहे.
या योजनेचा शेवटचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्यांनी पुढील हप्त्यासह अगोदरची रक्कम देखील मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4 हजार रुपये जमा होतील. मात्र याकरिता नोंदणीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. यासाठी तुम्हाला पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये एक 2000 चा आणि डिसेंबरमध्ये 2000 चा हप्ता मिळेल.
पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची? वाचा! :
● सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
● येथे ‘Farmers Corner’ या पर्यायावर क्लिक करा.
● त्यानंतर ‘New Farmer Registration’हा पर्याय निवडा.
● यामध्ये आधार क्रमांक नंबर भरा.
● आता स्क्रीनवरील कॅप्चा कोड भरून राज्याची निवड करा. यानंतर पुढील प्रक्रिया पहावी लागणार आहे.
● आता आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा.
● बँक खाते आणि शेताची माहिती यांचा तपशील भरा.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup