ICC Best T20 Team 2022 : टीम ICC ची आणि खेळाडू भारतीय, आयसीसीकडून T20 संघ जाहीर; भारतीय खेळाडूंचा बोलबाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2022 मधील सर्वोत्तम टी-20 संघाची घोषणा आज सोमवारी केली आहे. आयसीसीने पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ जाहीर केले असून या दोन्ही संघात भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या जागा मिळवल्या आहेत. आयसीसीच्या पुरुषांच्या सर्वोत्तम संघात 3 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे तर दुसरीकडे महिलासंघामध्ये 4 भारतीय खेळाडूंना जागा मिळालं आहे.
कसा आहे संघ? कोणाकोणाची झाली निवड? जाणून घेऊया थोडक्यात…
असा आहे आयसीसीचा 2022 मधील सर्वोत्तम टी-20 पुरुष संघ :
- जोस बटलर (कर्णधार)- इंग्लंड
- मोहम्मद रिझवान- पाकिस्तान
- विराट कोहली- भारत
- सूर्यकुमार यादव- भारत
- ग्लेन फिलिप्स- न्यूझीलंड
- सिंकदर रझा- झिम्बाब्वे
- हार्दिक पंड्या-भारत
- सॅम करन- इंग्लंड
- वानिंदु हसरंगा- श्रीलंका
- हॅरिस राऊफ- पाकिस्तान
- जोशुआ लिटल- आयर्लंड
असा आहे आयसीसीचा 2022 मधील सर्वोत्तम टी-20 महिला संघ :
- स्मृती मंधाना – भारत
- बेथ मूनी – ऑस्ट्रेलिया
- सोफी डेव्हाईन (कर्णधार) – न्यूझीलंड
- ऍश गार्डनर – ऑस्ट्रेलिया
- ऋचा घोष – भारत
- ताहिला मॅकग्रा – ऑस्ट्रेलिया
- निदा दार – पाकिस्तान
- दीप्ती शर्मा – भारत
- सोफी एक्लेस्टोन – इंग्लंड
- इनोका राणवीरा – श्रीलंका
- रेणुका सिंग – भारत