Take a fresh look at your lifestyle.

आंबे दोन किंमत तीन लाख रुपये; ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा!

0

आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात जास्त महाग आंब्याविषयी अशा काही गोष्टी सांगणार आहोत कि, ते एकूण तुम्ही थक्क व्हाल. आपण ज्या आंब्याविषयी बोलत आहोत त्याचे नाव आहे ताईयो नो तामागो. या आंब्याची बाजारातील किंमत लाखो रुपयात आहे बरं का!

ताईयो नो तामागो आंब्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हा आंबा दुकानात मिळत नाही तो लिलावात विकत घ्यावा लागतो. त्यामुळे सध्या जगातील सर्वात महाग आणि उत्तम आंब्याची चर्चा रंगली आहे.

ताईयो नो तामागो नावाचा हा अंबा जपानमधील मियाझरी प्रांतात पिकवला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला गोडव्यांसाह अननस आणि नारळाचे स्वाद असतो. या आंब्याला एका वेगळ्या पद्धतीने पिकविले जाते. या आंब्याचे प्रत्येक फळ झाडावर असताना जाळीच्या कपड्याने बांधले जातात आणि हा आंबा झाडावरून तोडला जात नाही. आंबा पिकल्यावर तो जाळीत अडकून राहतो. मग ते आंबे तोडून विक्रीसाठी बाजारात आणले जातात.

हा आंबा खायला अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असून त्याचा रंग आणि त्याचा वासही अत्यंत विलक्षण असतो. 2017 मध्ये या आंब्यासाठी दोन लाख 72 हजार रुपये मोजले गेले होते. या आंब्याचे जपानी संस्कृतीत एक विशेष महत्त्व आहे. जपानचे लोक गिफ्ट म्हणून हा अंबा देतात. ही भेट ज्याला मिळणार त्याचे नशीब सूर्यासारखे चमकते असे मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues