Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

elon musk : एलन मस्क यांना मागे टाकत ‘हे’ बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0

एलन मस्क (elon musk) यांना आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या सिंहासनावरून पायउतार झाले असून या यादीत आता लुई व्हिटॉनचे बॉस(LVMH Moët Hennessy – Louis Vuitton) बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून वर्णी लागली आहे. आताच हाती आलेल्या फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या यादीनुसार, टेस्लाच्या सीइओ एलन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान सप्टेंबर 2021 मध्ये मिळवले होते, मात्र आता ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

मात्र, आजचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट (LVMH – Chairman and CEO) हे कदाचितच आजही अनेक लोकांना माहित नसतील, चला तर मग जाणून घेऊया बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याबदल सविस्तर…

बर्नार्ड अर्नॉल्ट कोण आहे?

सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून ते जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनी, (LVMH Moët Hennessy – Louis Vuitton) चे सीईओ आहेत. फोर्ब्सच्या या अहवालानुसार सध्या बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती 188.6 अब्ज डॉलरची आहे. तर एलन मस्क यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर त्यांची एकूण संपत्ती 176.8 अब्ज इतकी राहिली आहे. तर या पाठोपाठ भारतातील प्रसिद्ध उद्योजक व अडाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अडाणी हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 134.8 अब्ज डॉलरची आहे.

हेही वाचा – रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या बॉण्डिंगचं रहस्य उलगडलं…
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी..!! टीम इंंडियाची मॅच स्टेडियममध्ये आता मोफत पाहता येणार

73 वर्षीय बर्नार्ड यांचा जन्म एका औद्योगिक कुटुंबात झाला. अभियंता म्हणून त्यांनी फेरेट-सॅव्हिनेल कन्स्ट्रक्शन कंपनीत व्यावसायिक म्हणून कारकीर्द सुरू केली आहे. यानंतर काहीवर्षातच म्हणजे 1984 मध्ये अर्नॉल्ट यांनी लक्झरी वस्तूंच्या बाजारात प्रवेश केला.

दरम्यान, एलन मस्क यांच्यासाठी 2022 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या वाईट ठरले आहे. मस्कच्या मालमत्तेचे मूल्य कमालीचे घसरले आहे. अलीकडे, त्यांनी ट्विटर, ही जगातील आघाडीची मायक्रो-ब्लॉगिंग साइट 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली. यानंतर त्यांच्या कंपन्यांच्या शेअरच्या किमती घसरल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. मस्कची प्रमुख कंपनी टेस्लाचा स्टॉक यावर्षी 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews