Take a fresh look at your lifestyle.

राज्यात ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? वाचा!

0

यंदा राज्यात ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णयमंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान जे कारखाने 15 ऑक्टोंबर पुर्वी ऊसाचे गाळप सुरु करतील त्या कारखान्यांच्या संचालकावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी सारख आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने अहवाल शासनास सादर केला आहे. त्यावर सहकार विभाग यावर निर्णय घेणार आहे

…तर ऊस गाळपास परवानगी नाही : ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली नाही अशा कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला. बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

यंदाच्या हंगामात अपेक्षित उत्पादन किती? : यंदाच्या गाळप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित आहे.

2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर आहे. यातून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे १९३ साखर कारखाने सुरु राहतील असा अंदाज आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.