Take a fresh look at your lifestyle.

शेळ्या आजारी पडूच नये म्हणून काय करावे?

0

1) दररोज सकाळी मालकाने प्रत्येक शेळ्यांचे निरीक्षण करावे.उदा.तोंड,डोळे,कान,नाक, हालचाल,लेंड्या इत्यादी.
2) मुक्त संचार शेळ्यांचा गोठा नेहमी हवेशीर,स्वच्छ व निर्जंतुक असावा.
3) दर तीन महिन्यांनी एकाच वेळी शेळ्यांचे जंत व गोचीड निर्मूलन करून घ्यावे.
4) रोगाची साथ येण्याच्या अगोदरच सर्व शेळ्यांना लसीकरण करून घ्यावे.
5) आजारी शेळ्यांची वैद्यकीय उपकरणे तसेच इंजेक्शने इतर शेळ्यांना वापरू नयेत.
6) दर आठ दिवसांनी गोठ्यात कीटकनाशकाची फवारणी करावी.
7) गोठ्यातील जमीन मऊ असावी व अडगळीची ठिकाणे नष्ट करावीत.
8) शेळ्यांना पावसात भिजू देऊ नये त्यासाठी भरपूर निवाऱ्याची सोय असावी.


9) आजारी शेळ्यांचा संक्रमित पशुआहार,गवत व चारा इतर शेळ्यांना देऊ नये.
10) मोठ्या शेळ्यांना दररोज अडीचशे ते तीनशे ग्रॅम पोषण आहार द्यावा.
11) शेळ्यांना नेहमी सकस व स्वच्छ हिरवा आणि वाळला चारा द्यावा.
12) शेळ्यांना झाडपालावर्गीय हिरवा चारा द्यावा उदा, दशरथघास, शेवरी, सुबाभूळ, बरसीम, लसूण घास,
तुती,मुरघास इत्यादी.
13) शेळ्यांच्या गोठ्यामध्ये खनिज विटा बांधाव्यात किंवा दररोज खनिज मिश्रणे द्यावीत.
14) शेळ्यांना पिण्यासाठी 24 तास ताजे, स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची सोय असावी.
15) शेळी चारा खात नसल्यास, बसून राहिल्यास, अंगाला ताप असल्यास, पातळ संडास करत असल्यास, तोंडातून
फेस येत असल्यास त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक :
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues