Take a fresh look at your lifestyle.

Jeans Pant Small Pocket button : जीन्स पँटच्या खिशावर लहान बटणं का असते? काय आहे याचे कारण जाणून घ्या सविस्तर

0

Fashion tips :- आजकालच्या तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सर्रास जीन्सचा वापर करताना दिसतात. अगदी लग्नकार्यापासून ते फिरायला जाण्यापर्यंत सर्व प्रसंगी जीन्सचा वापर केला जातो. जीन्स परिधान केल्यानंतर स्टायलिश लूक तर येतोच, मात्र त्याबरोबर दिवसभर त्यात वावर करणेही सहज सोपं होतं. अश्या या रोजच्या वापरातल्या जीन्सवरील एका गोष्टीकडे फारच कमी लोकांचं लक्ष गेलं असेल. ती गोष्ट म्हणजे जीन्सच्या पॉकेटवर असणारी लहान लहान बटणे! तुम्हाला माहित आहे का… ही लहान लहान बटणे जीन्सच्या पॉकेटवर का असतात? त्यांना तिथे जागा देण्यामागे नेमका उद्देश काय? नसेल माहित तर हि बातमी संपूर्ण वाचा… (Jeans Pant Small Pocket button)

काय आहे या बटणाचा रंजक कहाणी :

जीन्सच्या खिशावर असणाऱ्या या बटणांचा इतिहास बराच जुना आहे. 1829 साली लिवाइस ही कंपनी जीन्सच्या बाजारपेठेत नवीन होती. त्यावेळी फक्त खाणीत काम करणारे मजूर जीन्स परिधान करत होते. या मजुरांकडून जीन्सचे खिसे लवकर फाटतात, अशी सर्रास तक्रार केली जायची.

त्यावेळी जेकब डेविस या शिंप्याने जीन्सचे खिसे फाटू नयेत म्हणून त्यावर लहान बटणं लावली. या बटणांना रिवेटस् म्हटल जाते. त्यामुळे खिसा आणखी मजबूत झाला. जेकब डेविस यांना जीन्सवरील या लहान बटणांच्या संकल्पनेचे पेटंट घ्यायचे होते. मात्र, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तेव्हा जेकब यांनी लिव्हाइस कंपनीकडे मदत मागितली. त्यानंतर लिवाइस कंपनीने जीन्सच्या खिशांवर तांब्याची बटणं लावायला सुरुवात केली व जेकब यांना कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी दिली. तेव्हापासून जीन्सच्या खिशांवर लहान बटणं लावायची फॅशन सुरु झाली.

दरम्यान, आज इतक्या वर्षानंतरही 18 व्या शतकातील ही फॅशन प्रचलित आहे. जवळपास प्रत्येक जीन्स पँटच्या खिशांवर तुम्हाला अशी बटणं लावलेली दिसतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues